अंतिम मुदतीपर्यंत ७४ शाळांची नोंदणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2021 04:41 AM2021-02-16T04:41:34+5:302021-02-16T04:41:34+5:30

शिक्षण हक्क अधिनियमांतर्गत मागासवर्गीय, दिव्यांग व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना खासगी शाळेत प्रवेश मिळावा, याकरिता एकूण प्रवेश क्षमतेच्या २५ ...

Registration of 74 schools till the deadline | अंतिम मुदतीपर्यंत ७४ शाळांची नोंदणी

अंतिम मुदतीपर्यंत ७४ शाळांची नोंदणी

Next

शिक्षण हक्क अधिनियमांतर्गत मागासवर्गीय, दिव्यांग व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना खासगी शाळेत प्रवेश मिळावा, याकरिता एकूण प्रवेश क्षमतेच्या २५ टक्के जागा राखीव ठेवण्यात येतात. पात्र विद्यार्थ्यांना २५ टक्के कोट्यातून मोफत प्रवेश देण्यासाठी दरवर्षी शाळा नोंदणी, ऑनलाइन अर्ज आदी प्रक्रिया राबविण्यात येते. शैक्षणिक सत्र २०२१-२२ मधील मोफत प्रवेश प्रक्रियेसाठी २१ जानेवारीपासून खासगी शाळांची नोंदणी प्रक्रिया सुरू झाली. सुरुवातीला २९ जानेवारीपर्यंत नोंदणीसाठी अंतिम मुदत दिली होती. विहित मुदतीत बहुतांश शाळांना नोंदणी करणे शक्य झाले नसल्याने, १५ फेब्रुवारीपर्यंत नोंदणीसाठी मुदतवाढ देण्यात आली. गतवर्षी वाशिम जिल्ह्यात १०१ शाळांनी नोंदणी केली होती. या वर्षी १५ फेब्रुवारीपर्यंत ७४ शाळांनी नोंदणी केली असून, या शाळांमध्ये २५ टक्के कोट्यासाठी ४७७ जागा राखीव आहेत.

Web Title: Registration of 74 schools till the deadline

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.