असंघटीत बांधकाम कामगारांसाठी शिरपूर जैन येथे नोंदणी अभियान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2018 02:35 PM2018-01-30T14:35:52+5:302018-01-30T14:37:18+5:30
वाशिम : असंघटीत बांधकाम कामगार संघटनेच्यावतीने चालू बांधकामांवरच कामगारांची नोंदणी करण्याचे अभियान राबविण्यात येत आहे.
वाशिम : असंघटीत बांधकाम कामगार संघटनेच्यावतीने चालू बांधकामांवरच कामगारांची नोंदणी करण्याचे अभियान राबविण्यात येत आहे. या अंतर्गत मालेगाव तालुक्यातील शिरपूर जैन येथे घेण्यात आलेल्या शिबिरात ४० बांधकाम कामगारांची महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळामध्ये नोंद करून त्यांना मंडळाचे ओळखपत्र देण्यात आले.
असंघटीत बांधकाम कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष शेख सईद व वाशिम जिल्ह्यातील जिल्हा कामगार अधिकारी पी.आर. महाल्ले व त्यांच्यो कार्यालयातील कर्मचाºयांच्या उपस्थितीत हे शिबिर घेण्यात आले. या ठिकाणी पी.आर. महाल्ले यांनी बांधकाम कामगारांना कामगार कल्याण मंडळाचे लाभ कशा पध्दतीने मिळतील व कसे मिळवून घ्यायचे याबद्दल सविस्तर मार्गदर्शन करतानाच महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या एकूण १९ योजनांची माहिती सांगितली. कल्याण मंडळातून मिळणाºया लाभापासून कोणताही खरा बांधकाम कामगार वंचित राहू देणाार नसल्याचे आश्वासनही त्यांनी यावेळी कामगारांना दिले. या शिबिराला बांधकाम कामगार संघटनेच्या शिरपूर जैन शाखेतील सर्व पदाधिकारी उपस्थित होते. यामध्ये शाखाअध्यक्ष मुन्ना ठेकेदार, शाखा उपाध्यक्ष अ. गफ्फार, शाखा सचिव मो. फारुक, शाखा कोषाध्यक्ष, आलिम शहा, शाखा सहसचिव तस्लिम शेख, प्रसिध्दी प्रमुख मो. सादीक, व सदस्य शे. तारेख, शे. अनिस, शे. बिसमिल्ला, संजय कलाल, मुन्ना शहा, युनूस खान, पिंटू मुरकुटे, अ. सत्तार, शेख सादीक, ज्ञानेश्वर काळे, शेख नदीम, पिरु परसुवाले, केशव काळे, शेख अख्तर, शेख रङ्गीक, उमेश गावंडे, शेख अन्सार, शे. अजहर, शे. जुबेर, शे. सद्दाम, सिकंदर खान, जमीर शहा, नाजीम खान, वसीम मास्टर, आदींसह अनेक कामगारांची उपस्थिती होती.