पुनर्वसीत कौलखेडचे गावकरी धडकले लघुपाटबंधारे कार्यालयावर; अभियंत्यांशी केली चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2018 03:12 PM2018-01-17T15:12:46+5:302018-01-17T15:16:44+5:30
वाशिम : रिसोड तालुक्यातील बोरखेडी प्रकल्पातील पुनर्वसीत गाव कौलखेड येथे अद्याप कुठल्याच सुविधा पुरविण्यात आल्या नाहीत. त्यामुळे संतप्त झालेल्या गावकºयांनी बुधवार, १७ जानेवारीला वाशिमच्या लघुपाटबंधारे कार्यालयावर धडक मोर्चा काढून कार्यकारी

बोरखेडी लघु पाटबंधारे योजनेअंतर्गत कौलखेड येथील गावकºयांची जमीन सन २००५-०६ मध्ये संपादित करण्यात आली, तसेच गावठाणचे पुनर्वसन करण्यात आले. पुनर्वसित भागात मात्र गेल्या ८ ते ९ वर्षांमध्ये कुठल्याच ठोस सुविधा पुरविण्यात आल्या नाहीत. १९ सप्टेंबर २०११ रोजी प्रकल्पग्रस्तांनी या प्रश्नासंबंधी उपोषणही केले होते. त्याची दखल घेत प्रशासनाने सदर गावाचा अहवाल तयार करुन पाटबंधारे कार्यालयाच्या अधिक्षक अभियंत्यांकडे सादर केला होता. अहवालानुसार, पुनर्वसित कौलखेड येथील शाळा, जलकुंभ तसेच गावाकडे जाणाºया रस्त्याचे काम निकृष्ट झाल्याचे नमूद करण्यात आले होते. याबाबत २९ सप्टेंबर २०११ ला अधिक्षक अभियत्यांनी लेखी पत्र देताना प्रकल्पबाधित गावाच्या समस्यांचे निवारण ३१ मे २०१२ पर्यंत करण्याचे लेखी आश्वासन दिले होते; परंतु प्रस्तावित कामे अद्याप झाली नाहीत. त्यामुळे संतप्त प्रकल्पग्रस्तांसह ग्रामपंचायत पदाधिकाºयांनी १७ जानेवारीला लघु पाटबंधारे कार्यालयावर धडक मोर्चा काढून कार्यकारी अभियंता शिवाजी जाधव यांच्याशी चर्चा केली.