रेमडेसिवीरच्या दर सवलतीमुळे विक्रेत्यांसह खासगी दवाखान्यांच्या वसुलीस बसणार चाप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2020 12:29 PM2020-10-21T12:29:24+5:302020-10-21T12:32:01+5:30
Remdesivir Injectio in concessions Rate in Washim जनआरोग्य योजनेंतर्गत हे इंजेक्शन २३६० रुपयांत उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
वाशिम: कोरोनाबाधित रुग्णांसाठी आवश्यक असलेले रेमडेसिव्हर इंजेक्शनची किेंमत सामान्य रुग्णांच्या खिशाला परवडत नाही. किंमत जासत असल्याने या इंजेक्शनअभावी अनेकांना जीव गमवावा लागत आहे. त्यामुळे सामान्यातल्या सामान्य कोरोनाबाधित रुग्णास स्वस्त दरात हे इंजेक्शन उपलब्ध व्हावे म्हणून जनआरोग्य योजनेंतर्गत हे इंजेक्शन २३६० रुपयांत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. जिल्ह्यातील औषधी दुकानावर परवानगीने विक्रेत्यांना हे इंजेक्शन विक्रीसाठी उपलब्ध करून ठेवता येणार आहेत.
शासनाच्या या निर्णयामुळे आजवर मनमानी पद्धतीने इंजेक्शनची किमंत वसूल करणारे खासगी कोविड सेंटर आणि जिल्ह्यातील औषध विक्रेत्यांवर चाप बसणार आहे. येत्या काही दिवसांतच जिल्ह्यात हे इंजेक्शन उपलब्ध सवलतीच्या दरात हे इंजेक्शन उपलब्ध केले जाणार असल्याचे आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले.
प्रिस्क्रिप्शनवरच मिळणार इंजेक्शन
सर्वसामान्य रुग्णांना कोविड उपचारासाठी रेमडेसिव्हिर इंजेक्शन स्वस्तदरात उपलब्ध करण्यात येणार असले तरी, त्याचा गैरफायदा घेतला जाऊ नये म्हणून केवळ डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनवरच ते विकता येणार आहे. -डॉ. मधूकर राठोड, जिल्हा शल्यिचिकित्सक, वाशिम
सवलतीत इंजेक्शन मिळण्यासाठी नियम
रेमडेसिव्हिर इंजेक्शन निर्मिती करणाऱ्या कंपनीमार्फत दिवसाला शंभर इंजेक्शन उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. दुकानदारास हे इंजेक्शन २८०० रुपयांस मिळणार असून, त्यावर १२ टक्के जीएसटी लावण्यात आला आहे. त्यामुळे दुकानदारास हे इंजेक्शन विक्री करताना केवळ पाच टक्के कमीशनवर विकावे लागणार आहे. त्यामुळेच कोविडच्या रुग्णांना आता ५८०० रुपयांऐवजी २३६० रुपयांना हे इंजेक्शन मिळू शकणार आहे.
रेमडेसिव्हिर इंजेक्शन कुणाला द्यायचे याचा अधिकार जिल्हा शल्य चिकित्सक व त्यांनी नेमलेले वैद्यकीय अधिकाऱ्यांना राहणार असून, वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या स्वाक्षरी असलेल्या प्रिस्क्रीप्शनवरच हे इंजेक्शन संबंधित औषधी दुकानदाराकडून विकत घेता येणार आहे.
मेडिकलची यादी
- प्रधानमंत्री जनऔषधी,
- मराठा मेडिकल वाशिम,
- न्यू मराठा मेडिकल वाशिम,
- बाहेती मेडिकोज वाशिम,
- सिक्यूरा हॉस्पिटल,
- माऊली मेडिकल वाशिम,
- लक्ष्मी मेडिकोज वाशिम, न्यू दागडिया मेडिकल,
- नाथ मेडिकल वाशिम,
- काकडे मेडिकल वाशिम,
- जनता मेडिकल वाशिम,
- नवकार मेडिकल वाशिम