महाभूलेख पोर्टलवरील सातबारातील तांत्रिक दोष दूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2020 11:18 AM2020-07-27T11:18:36+5:302020-07-27T11:18:53+5:30
‘लोकमत’ने २४ जुलै रोजी महाभूलेख पोर्टलवरील सातबारात तांत्रिक दोष’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित करून याकडे प्रशासनाचे लक्ष वेधले.
- लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: पीकविमा योजनेत आॅनलाईन अर्ज भरताना महाभूलेख पोर्टलवरील सातबारा अपलोड करण्यात अडचणीत येत होत्या. ‘लोकमत’ने २४ जुलै रोजी महाभूलेख पोर्टलवरील सातबारात तांत्रिक दोष’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित करून याकडे प्रशासनाचे लक्ष वेधले. त्याची दखल घेत प्रशासनाने २५ जुलै रोजी यातील तांत्रिक दोष दूर केला. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
पीकविमा भरण्याची अंतीम मुदत जवळ येत असताना जिल्ह्यातील काही तलाठी सज्जातील सातबारा दस्तऐवज तांत्रिक अडचणीमुळे विमा पोर्टलवर दिसत नव्हते. त्यामुळे शेतकऱ्यांना पीक विमा भरणे अडचणीचे झाले होते. आपले सरकार सेवा केंद्रांसह, बँकांकडूनही जिल्हा प्रशासनाला ही माहिती देण्यात आली होती. शेतकºयांची समस्या लक्षात घेऊन लोकमतने या संदर्भात २४ जुलैच्या अंकात वृत्त प्रकाशित करून प्रशासनाचे लक्ष वेधल्यानंतर २५ जुलै रोजी यातील तांत्रिक दोष दूर करण्यात आला. यात वाशिम तालुक्यातील भाग ३, मालेगाव तालुक्यातील मारसूळ भाग १ व २, मेडशी भाग १ व २, शिरपूर भाग १, २ व ३, मुंगळा भाग १ व २, रिसोड तालुक्यातील रिसोड भाग २. ३ गोवर्धन भाग १ व २, व्याड भाग १ व २, मानोरा तालुक्यातील फुलउमरी भाग १ व २, गिरोली भाग १ व २, मंगरुळपीर तालुक्यातील वनोजा भाग १ व २, तसेच कारंजा तालुक्यातील मनभा भाग १ व २ मधील गावांतील तांत्रिक दोष दूर करण्यात आले आहेत. यामुळे सर्व गावे आता पोर्टलवर दिसत असल्याने पीक विमा भरू इच्छिणाºया शेतकºयांना मोठा दिलासा मिळाला आहे.
गावागावात जनजागृतीच्या सुचना
महाभूलेख पोर्टलवरील आॅनलाईन सातबारातील तांत्रिक दोष दूर केल्यानंतर संबंधित गावे पीक विमा योजनेच्या पोर्टलवर दिसत आहेत. याबाबत संबंधित गावांत दवंडी देऊन शेतकºयांत जनजागृती करण्याच्या सुचना जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी एस. एम्. तोटावार यांनी सर्व पंचायत समितीच्या गटविकास अधिकाºयांना २५ जुलै रोजीच दिल्या आहेत.