निधीअभावी लघु प्रकल्पाची दुरूस्ती रखडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2020 05:05 PM2020-11-23T17:05:35+5:302020-11-23T17:05:52+5:30
१२८ कामांसाठी २९ कोटी ९९ लाख ५५ हजार रुपयांचा प्रस्ताव शासन स्तरावर लालफितशाहीत अडकला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : शासनाकडून निधी प्राप्त न झाल्याने जिल्हा परिषदेच्या जलसंधारण विभागांतर्गत येणाºया लघुसिंचन प्रकल्पांची दुरूस्ती, बळकटीकरण व अन्य कामे रखडली आहेत. १२८ कामांसाठी २९ कोटी ९९ लाख ५५ हजार रुपयांचा प्रस्ताव शासन स्तरावर लालफितशाहीत अडकला आहे.
जलसंधारण विभागांतर्गत येणाºया प्रकल्प, योजनांची दुरुस्ती करून, त्यांचे बळकटीकरण करणे व सिंचन क्षमता पुनरुजिव्वीत करणे आवश्यक आहे. प्रकल्पांच्या गेटमध्ये बिघाड, भिंतीवर वाढलेली झाडेझुडपे, तसेच इतर कारणांमुळे शेतकºयांना पुरेसे पाणी मिळण्यासह इतर अडचणींचा सामना करावा लागतो. अशा प्रकल्पांची विशेष दुरुस्ती व बळकटीकरण करण्यासाठी जलसंधारण विभागाने शासनाकडे निधीची मागणी केली आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांनीदेखील शासनस्तरावर पाठपुरावा करीत सिंचनाचा अनुशेष दूर करण्यासाठी भरीव निधी देण्यात यावा, अशी मागणी लावून धरली. अद्याप शासनाकडून निधी मिळाला नसल्याने लघु प्रकल्पाच्या दुरूस्तीची कामे रखडली आहेत. सध्या रब्बी हंगामाला सुरूवात झाली आहे. गेट नादुरूस्त असल्याने काही लघु प्रकल्पातून पाण्याची गळती होत असल्याने याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. निधीअभावी लघु प्रकल्पांचे बळकटीकरणही रखडले आहे. जिल्ह्यातील सिंचनाचा अनुशेष दूर करण्यासाठी केंद्र व राज्ज्य सनाने पुरेशा प्रमाणात निधी पुरविणे गरजेचे आहे.