शेलुखडसेच्या सरपंचाविरोधातील अहवाल वरिष्ठांच्या दालनात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2021 04:25 AM2021-07-19T04:25:54+5:302021-07-19T04:25:54+5:30
शेलु खडसेच्या सरपंच रेणुका भानुदास ताकतोडे यांच्याविरोधात गत काही महिन्यांपूर्वी शेलू खडसे येथील टिल्लूबाई पारडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल ...
शेलु खडसेच्या सरपंच रेणुका भानुदास ताकतोडे यांच्याविरोधात गत काही महिन्यांपूर्वी शेलू खडसे येथील टिल्लूबाई पारडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली होती. तक्रारीत नमूद करण्यात आले होते, की सरपंच रेणुका भानुदास ताकतोडे व त्यांचे पती हे शेलुखडसे येथील ई-क्लासच्या जागेवर अतिक्रमण करून राहत आहेत. तशी नोंदही शेलुखडसे ग्रामपंचायतच्या दप्तरी आहे. त्या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार तहसीलदारांनी तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांना तक्रारीच्या अनुषंगाने सरपंच ताकतोडे राहत असलेल्या जागेचा स्वयंस्पष्ट अहवाल मागितला होता. त्यानुसार तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांनी तक्रारीचा वस्तुनिष्ठ अहवाल महसूल प्रशासनाकडे सादर केला आहे. आता हा अहवाल तहसीलदार यांनी अतिरिक्त जिल्हाधिकारी वाशिम यांच्याकडे पाठविला असून लवकरच त्यावर जिल्हाधिकारी सुनावणी करणार आहेत. याप्रकरणी नेमका काय निर्णय लागणार? याकडे लक्ष लागून आहे.