वसतिगृह असुविधांप्रकरणी मागविला अहवाल

By admin | Published: June 24, 2016 12:03 AM2016-06-24T00:03:19+5:302016-06-24T00:03:19+5:30

वाशिम जिल्हाधिकारी, उपसंचालकांनी घेतली ‘लोकमत’च्या वृत्ताची तडकाफडकी दखल.

Report for the hostel incompatibility | वसतिगृह असुविधांप्रकरणी मागविला अहवाल

वसतिगृह असुविधांप्रकरणी मागविला अहवाल

Next

सुनील काकडे / वाशिम
सामाजिक न्याय विभागामार्फत चालविल्या जाणार्‍या वसतिगृहांमध्ये उद्भवलेल्या गंभीर समस्यांबाबत 'लोकमत'ने बुधवार, २३ जूनच्या अंकात प्रकाशित केलेल्या ह्यस्टिंग ऑपरेशनह्णची तडकाफडकी दखल घेण्यात आली. जिल्हाधिकारी राहुल व्दिवेदी आणि अमरावती उपसंचालक कार्यालयाने याप्रकरणी वाशिमच्या सामाजिक न्याय विभागाला विनाविलंब सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या विद्यार्थ्यांंसाठी लाखो रुपये खचरून सामाजिक न्याय विभागामार्फत वसतिगृहे चालविली जातात. मात्र, शासनाकडून मिळणारा पैसा मधातच ह्यगडपह्ण होत असल्याने वसतिगृहांमध्ये विविध समस्या उद्भवल्याचे वास्तव ह्यलोकमतह्णने मंगळवार, २0 जून रोजी केलेल्या ह्यस्टिंग ऑपरेशनह्णमधून उघड झाले. वाशिम शहरातील पुसद रोडवर असलेल्या वसतिगृहाच्या भाडेतत्वावरील इमारतीत पाच छोट्या स्वरूपातील खोल्या आणि एका हॉलमध्ये विद्यार्थ्यांंच्या राहण्याची सोय करण्यात आलेली आहे. कडी-कोंड्याविना असलेले दरवाजे, ठिकठिकाणी साचलेला कचरा, पसरलेली दुर्गंंधी, तुटलेले पलंग, मळालेल्या गाद्या, भिंतींची झालेली दुरवस्था, आदी गंभीर प्रकार लोकमतच्या पाहणीत आढळून आले.
सामाजिक न्याय विभागाकडूनच चालविल्या जाणार्‍या शासकीय बहूद्देशीय संमिश्र अपंग केंद्रातही अनेक गंभीर समस्या उद्भवल्या असून तेथे एकही शौचालय नाही, सर्वात वरच्या मजल्यावर असलेल्या स्नानगृहांची प्रचंड दुरवस्था झालेली आहे. एका हॉलमध्ये सर्वच विद्यार्थ्यांंना अक्षरश: कोंबण्यात येते. झोपण्यासाठी एकही पलंग नसल्यामुळे विद्यार्थ्यांंना मळालेल्या गाद्यांवर जमिनीवरच झोपावे लागत असल्याचे चित्र या वसतिगृहामध्ये दिसून आले.
जिल्ह्यातील कारंजा लाड येथेदेखील सामाजिक न्याय विभागामार्फत मुलांचे वसतिगृह चालविले जाते. तेथेही प्रचंड प्रमाणात असुविधा असल्याने विद्यार्थ्यांंची गैरसोय होत असल्याची वस्तूस्थिती ह्यलोकमतह्णने उजागर केली. दरम्यान, या गंभीर प्रकरणाची तडकाफडकी दखल घेवून वाशिमचे जिल्हाधिकारी राहुल व्दिवेदी तथा सामाजिक न्याय विभागाच्या अमरावती येथील उपसंचालकांनी वाशिमच्या सामाजिक न्याय विभागाच्या उपायुक्तांना यासंदर्भात विनाविलंब अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

Web Title: Report for the hostel incompatibility

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.