मंगरूळपीरचा अहवाल सादर : मालेगाव, कारंजास विलंब
By admin | Published: January 9, 2015 01:41 AM2015-01-09T01:41:42+5:302015-01-09T01:41:42+5:30
मंगरूळपीर तालुक्यात २0.६0 हेक्टरचे नुकसान : गारपीटग्रस्त शेतकर्यांना मदतीची आशा.
वाशिम : गारपीट व अवकाळी पावसामुळे जिल्हय़ात झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यात आला. यामध्ये ३७ गावे बाधित आढळून आले होते. ताबडतोब अंतिम अहवाल सादर करण्याचे आदेश पालकमंत्र्यांनी दिले होते. त्या अनुषंगाने मंगरूळपीर तालुक्यात झालेल्या नुकसानीचा अंतिम अहवाल सादर करण्यात आला. मालेगाव व कारंजा तालुक्यात सर्वाधिक नुकसान झाल्याने नुकसानग्रस्त गावांचा अंतिम अहवाल सादर करण्यास विलंब होत आहे.
गारपिटीमुळे अंदाजे ५ हजार हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात आला हो ता. मालेगाव तालुक्यातील सर्वाधिक २५ गावांना या गारपीट व अवकाळी पावसाचा फटका तर कारंजा तालुक्यातील १0 व मंगरुळपीर तालुक्यातील दोन गावांमध्ये काही प्रमाणात नुकसान झाले असल्याचे जिल्हाधिकारी यांच्या पाहणीत आढळून आले होते. यावेळी त्यांनी नुकसानग्रस्त भागाचा सर्व्हे व पंचनामा करून अंतिम नुकसानीचा अहवाल सादर करण्याचे संबंधितांना सूचना केल्या होत्या. मंगरूळपीर तालुक्यामध्ये पूर, वनोजा परिसरात ३१ डिसेंबर रोजी रात्री झालेल्या गारपिटीमुळे जवळपास २५ हेक्टर फळबागांचे नुकसान झाले असल्याचा अंदाज असल्याची माहिती तहसीलदार बळवंत अर खराव यांनी वर्तविली होती. अंतिम अहवालामध्ये २0.६0 हेक्टर फळबागांचे नुकसान झाल्याचे नमूद करण्यात आले आहे.
या शेतकर्यांना ताबडतोब मदत मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त केल्या जात आहे. मालेगाव येथील तहसीलदार यांच्याशी संपर्क साधला असता मालेगाव तालुक्यातील नुकसानी अहवाल अद्याप कृषी विभागाकडून प्राप्त झाला नाही. उदयापर्यंंत अहवाल मिळणार असल्याची शक्यता असल्याचे सांगितले. गारपिटीमुळे कारंजा तालुक्यातील जवळपास १0 गावातील पिकांचे नुकसान झाल्याचा अंदाज व र्तविण्यात आला होता; मात्र कारंजा तालुक्यातील अंतिम अहवाल अद्याप तयार झाला नाही.