गणतंत्र दिवस परेडसाठी धाबेकर महाविद्यालयाच्या मयूर वडतेची निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2018 03:18 PM2018-12-31T15:18:19+5:302018-12-31T15:18:43+5:30
कारंजा लाड : श्रीमती शकुंतलाबाई धाबेकर महाविद्यालयाचा विद्यार्थी मयूर वडतेची निवड मुंबईत गणतंत्र दिवासानिमित्त होणाºया आर. डी परेडसाठी झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
कारंजा लाड : श्रीमती शकुंतलाबाई धाबेकर महाविद्यालयाचा विद्यार्थी मयूर वडतेची निवड मुंबईत गणतंत्र दिवासानिमित्त होणाºया आर. डी परेडसाठी झाली आहे.
देशभराच्या महाविद्यालयातील एन. सी. सी. व राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांचा सहभाग दिल्ली तसेच राज्याच्या राजधानीत होणाºया गणतंत्र तसेच स्वातंत्र्य दिवसाच्या आर. डी. परेडसाठी असतो. या परेडसाठी निवड होणे ही विद्यार्थ्यांच्या जीवनातील फार मोठी उपलब्धी मानली जाते. यासाठी विद्यार्थी खुप मेहनत घेत असतात. श्रीमती शकुंतलाबाई धाबेकर महाविद्यालयाचा व कारंजा तालुक्यातील पोहा या गावचा बी. ए. भाग तीन मध्ये शिकत असलेला विद्यार्थी मयूर सुरेश वडते याची निवड मुंबईत गणतंत्र दिवासानिमित्त होणाºया आर. डी परेडसाठी झाली आहे. त्याची ही निवड राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ नागपूर येथे २५ नोव्हेंबर ते ०४ डिसेंबर २०१८ दरम्यान संपन्न झालेल्या पश्चिम विभागीय रासेयो पूर्व राष्ट्रीय प्रजासत्ताक दिनाकरीता आयोजित निवड चाचणी शिबिरातून करण्यात आली आहे. ही संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ अमरावती राष्ट्रीय सेवा योजना या संवगार्तून झाली असून तो मुंबई येथे होणाºया गणतंत्र परेडमध्ये अमरावती विद्यापीठाचे प्रतिनिधीत्व करणार आहे. त्याला मिळालेल्या या यशाबाबत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुभाष गवई, रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ. योगेश पोहोकार व सहकार्यक्रम अधिकारी पराग गावंडे, डॉ. अशोक जाधव, व मुख्य लिपिक राजेश अढाऊ यांनी पुष्पगुच्छ देवून मयूर वडतेचा सत्कार केला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुभाष गवई यांच्या मार्गदर्शन व प्रेरणेमुळेच आपल्याला हे यश मिळू शकले असल्याचे मत मयूर वडते यांनी व्यक्त केले. याप्रसंगी महाविद्यालयाचे शिक्षक, प्रा. संजय कापशीकर, प्रा. नितेश थोरात, प्रा. दिलीप वानखेडे, ग्रंथपाल उमेश कुºहाडे व शिक्षकेत्तर कर्मचारी उमेश देशमुख, प्रवीण डफडे, बाळकृष्ण खानबरड, राजू राऊत, अरूण ईसळ, प्रकाश लोखंडे व सुनील राजगुरे यांनीही या विद्याथ्याचे स्वागत केले .