बाजार समिती निवडणुकीत दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

By admin | Published: August 10, 2015 01:36 AM2015-08-10T01:36:24+5:302015-08-10T01:36:24+5:30

मंगरुळपीर येथे ९७ टक्के मतदान; रिसोड, कारंजात चुरस.

The reputation of veterans in the market committee elections will be achieved | बाजार समिती निवडणुकीत दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

बाजार समिती निवडणुकीत दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

Next

वाशिम : सहकार क्षेत्रासाठी महत्त्वाच्या ठरणार्‍या रिसोड, वाशिम, कारंजा व मानोरा बाजार समित्या ताब्यात घेण्यासाठी दिग्गज राजकीय पुढार्‍यांनी प्रतिष्ठा पणाला लावल्याने राजकारण चांगलेच तापले आहे. दरम्यान, मंगरुळपीर येथील बाजार समितीसाठी ९ ऑगस्ट रोजी ९७.४९ टक्के मतदान झाले आहे. ग्रामपंचायत निवडणुकीनंतर सहकार क्षेत्रात महत्त्वपूर्ण म्हणून गणल्या जाणार्‍या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. रिसोड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूक रिंगणात १८ जागेसाठी ५२ उमेदवार उतरले आहेत. वाशिम जिल्हय़ाच्या ह्यराजकारणाह्णचा केंद्रबिंदू रिसोड तालुक्याभोवती असतो, असे म्हटले जाते. सहकार क्षेत्रातही रिसोड तालुक्यातील दिग्गज मंडळी ह्यवजनह्ण ठेवून आहेत. २२ ऑगस्ट रोजी मतदान होणार असून, तत्पूर्वी एका बाजूने माजी खासदार अनंतराव देशमुख तर दुसर्‍या बाजूने आमदार अमित झनक या निवडणुकीचे नेतृत्व करीत आहेत. शिवसेना आणि भाजपाने नेतृत्वाची प्रत्यक्ष धुरा हाती न घेता छुप्या पद्धतीने फिल्डिंग लावल्याने ऐनवेळी धक्कादायक निकाल लागण्याचा अंदाज वर्तविला जात आहे. काँग्रेसचे दोन्ही गट बाजार समिती निवडणुकीच्या निमित्ताने एकमेकांसमोर उभे ठाकल्याने ह्यतळ्यात की मळ्यातह्ण असणार्‍यांची गोची होत आहे. आपले हाडाचे सर्मथक कोण, याची चाचपणी करण्याची संधी अनंतराव देशमुख व अमित झनक यांना या निवडणूक निमित्ताने चालून आली आहे. कारंजा कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत १८ जागेसाठी ४४ उमेदवार रिंगणात आहेत. १६ ऑगस्ट रोजी मतदान असून, आजी-माजी आमदारांचे गट आमनेसामने ठाकल्याने ही निवडणूक चुरशीची ठरत आहे. सहकार क्षेत्रावर माजी आमदार प्रकाश डहाके यांची पकड घट्ट आहे. डहाके यांच्या ताब्यातून बाजार समिती हिसकावून घेण्यासाठी विरोधकांनीदेखील कंबर कसल्याने राजकारण तापले आहे. वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीत माजी खासदार अनंतराव देशमुख व माजी राज्यमंत्री सुभाषराव ठाकरे यांचे मनोमीलन झाले असून, दुसर्‍या बाजूने माजी सभापती नारायणराव गोटे किल्ला लढवित आहेत. वाशिमसाठी ६ सप्टेंबर रोजी मतदान होणार आहे. मानोरा कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीतही चुरस निर्माण झाली आहे.

Web Title: The reputation of veterans in the market committee elections will be achieved

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.