राज्य कृषी सेवा महांसघाचे जिल्हाधिकाºयांना निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2017 07:44 PM2017-10-13T19:44:31+5:302017-10-13T19:45:05+5:30

यवतमाळ येथील जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी व कृषी विकास अधिकारी कार्यालयावर महाराष्टÑ नवनिर्माणसेनेच्या कार्यकर्त्यांतर्फै ११ आॅक्टोंबर रोजी धुडगूस घालण्यात आला. या घटनेचा महाराष्टÑ राज्य कृषी सेवा महासंघ वाशिम शाखेच्यावतिने १३ आॅक्टोंबर रोजी निषेध नोंदविण्यात आला.

Request to District Collectorate of State Agricultural Services | राज्य कृषी सेवा महांसघाचे जिल्हाधिकाºयांना निवेदन

राज्य कृषी सेवा महांसघाचे जिल्हाधिकाºयांना निवेदन

googlenewsNext
ठळक मुद्देकार्यालयात धुडगूस घटनाकार्यवाहिची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम  : यवतमाळ येथील जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी व कृषी विकास अधिकारी कार्यालयावर महाराष्टÑ नवनिर्माणसेनेच्या कार्यकर्त्यांतर्फै ११ आॅक्टोंबर रोजी धुडगूस घालण्यात आला. या घटनेचा महाराष्टÑ राज्य कृषी सेवा महासंघ वाशिम शाखेच्यावतिने १३ आॅक्टोंबर रोजी निषेध नोंदविण्यात आला. याबाबत जिल्हाधिकारीयांना निवेदन सादर करुन या घटनेची चौकशी करुन दोषिंवर कार्यवाही करण्याची मागणी केली आहे.
महाराष्टÑ राज्य कृषी सेवा संघ वाशिम जिल्हयाच्यावतिने दिलेल्या निवेदनात नमूद केले काी, मनसेच्या कार्यकर्त्यांनी कार्यालयात येवून धुडगूस घालून घोषणाबाजी करुन शासकीय मालमत्तेचे नुकसान केले आहे. शासकीय कामकाजात अडथळा निर्माण केला तेसच मोर्चा आणून घोषणाबाजी केली व कार्यालयातील साहित्यांची फेकाफेक केली. शासकीय कामात अडथळा आणणे,सरकारी कर्मचारी यांचेशी वाद घालणे, धमकी देणे, सरकारी कार्यालयात परवानगी शिवाय प्रवेश करणे, शासकीय मालमत्तेचे नुकसान करणे, हिंसक जमाव गोळा करणे हा प्रकार गंभीर असून सदर संघटनेने केलेल्या या घटनेची गंभीर दखल घेवून कार्यवाहीची मागणी करण्यात  आली आहे. या घटनेमुळे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी , कृषी विकास अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी पंचायत समिती, कृषी पर्यवेक्षक व कृषी सहायक या सर्वांमध्ये सदर घटनेमुळे भितीचे वातावरण निर्माण होवून मनोबल खचले आहे. क्षेत्रीय पातळीवर काम करणे कठीण झालेले आहे. झालेल्या घटनेचा तीव्र निषेध नोंदवित बाधित शेतकरी व शेतमजुर यांचे प्रति संवेदना व्यक्त केल्यात. निवेदनावर महाराष्टÑ राज्य कृषी अधिकारी संघटना जिल्हा वाशिमचे अध्यक्ष, राजपत्रित अधिकारी संघटना , कृषी पर्यवेक्ष्ज्ञक संघटना , कृषी सहायक संघटना, ट्रेसर असोशिएशन संघटना, लिपिक वर्गीय संघटना, वाहन चालक संघटना, चर्तुर्थ श्रेणी कर्मचारी संघटना अध्यक्षांची स्वाक्षरी आहेत.

Web Title: Request to District Collectorate of State Agricultural Services

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.