‘त्या’ कर्मचाऱ्यांची माहिती मागविली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2020 12:50 PM2020-08-09T12:50:08+5:302020-08-09T12:50:19+5:30
ठाण मांडून बसलेल्या १२ ते १३ कर्मचाºयांची बदली यावर्षी होईल का, याकडे महसूल कर्मचाºयांचे लक्ष लागून आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : जिल्हाधिकारी कार्यालयातील विविध विभागात गत १० ते १२ वर्षांपासून ठाण मांडून बसलेल्या कर्मचाऱ्यांसंदर्भात ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित करताच, या कर्मचाºयांची माहिती मागविण्यात आली आहे. १० आॅगस्ट रोजी ही बदली प्रक्रिया असून, गत काही वर्षांपासून जिल्हाधिकारी कार्यालयातच ठाण मांडून बसलेल्या १२ ते १३ कर्मचाºयांची बदली यावर्षी होईल का, याकडे महसूल कर्मचाºयांचे लक्ष लागून आहे.
कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव असल्यामुळे यावर्षी कर्मचाºयांची विनंती, आपसी व प्रशासकीय बदली प्रक्रिया लांबणीवर पडली. जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचाºयांची प्रशासकीय आणि विनंतीनुसार सार्वत्रिक बदली प्रक्रिया १० आॅगस्ट रोजी होणार आहे. शासन नियमानुसार एका कार्यालयात सहा वर्षे सेवा देता येते. अपवादात्मक परिस्थितीत सहा महिने, एक वर्र्षे मुदतवाढही मिळू शकते. परंतू, जिल्हाधिकारी कार्यालयात जवळपास १२ ते १३ कर्मचारी हे सात ते दहा वर्षांपासून ठाण मांडून आहेत. प्रतिनियुक्तीच्या आड काही कर्मचारी जिल्हाधिकारी कार्यालयातील विविध विभागात कार्यरत आहेत. मर्जीतील या कर्मचाºयांना अद्याप अन्यत्र बदलीवर पाठविण्यात आले नाही, याची चर्चा आहे. यासंदर्भात ‘लोकमत’ने ४ आॅगस्ट रोजी वृत्त प्रकाशित करून प्रशासनाचे लक्ष वेधले होते. याची दखल घेत जिल्हाधिकारी कार्यालयात ठाण मांडून बसलेल्या कर्मचाºयांची माहिती प्रशासनाने मागविली आहे. त्यामुळे ठाण मांडून बसलेल्या कर्मचाºयांची खरोखरच बदली होणार की प्रतिनियुक्तीच्या आड पुन्हा अभय मिळणार, याकडे लक्ष लागून आहे.
जिल्हा परिषदेत ठाण मांडून बसलेल्या कर्मचाºयांची बदली
जिल्हा परिषदेत ७ आॅगस्ट रोजी गट क आणि गट ड संवर्गातील कर्मचाºयांची बदली प्रक्रिया पार पडली. नियमापेक्षा अधिक कालावधी झालेला असतानाही आतापर्यंत जिल्हा परिषदेच्या विविध विभागात ठाण मांडून बसलेल्या कर्मचाºयांची, ७ आॅगस्ट रोजीच्या बदली प्रक्रियेत अन्य ठिकाणी बदली करण्यात आली. जिल्हा परिषदेप्रमाणेच जिल्हाधिकारी कार्यालयातही ठाण मांडून बसलेल्या कर्मचाºयांची अन्यत्र बदली होईल का? याकडे लक्ष लागून आहे.