जि.प.च्या रिक्त १४ सर्कलचे आरक्षण जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2021 04:39 AM2021-03-24T04:39:26+5:302021-03-24T04:39:26+5:30
वाशिम जिल्हा परिषदेच्या जानेवारी २०२० मध्ये झालेल्या निवडणुकीत नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी ५० टक्क्यांपेक्षा अधिक आरक्षण झाल्याच्या मुद्यावरून सर्वोच्च न्यायालयाने ...
वाशिम जिल्हा परिषदेच्या जानेवारी २०२० मध्ये झालेल्या निवडणुकीत नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी ५० टक्क्यांपेक्षा अधिक आरक्षण झाल्याच्या मुद्यावरून सर्वोच्च न्यायालयाने ४ मार्च रोजी जिल्ह्यातील ओबीसी सर्कलमधील चौदाही सदस्यांची पदे रद्दबातल ठरविली. यासह सहा पंचायत समित्यांमधील नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गातून निवडून आलेल्या २७ सदस्यांचे सदस्यत्वही रद्द ठरले. दरम्यान, या सर्व पदांची लवकरच निवडणूक होणार असून २३ मार्च रोजी महिला आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली. त्यानुसार जिल्ह्यातील भामदेवी, तळप, फुलउमरी, कंझरा, पांगरी नवघरे, गोभणी आणि काटा हे जि.प. सर्कल महिलांसाठी आरक्षित झाले असून कुपटा, दाभा, आसेगाव, कवठा खु., भर जहॉंगीर, पार्डी टकमोर आणि उकळीपेन हे सर्कल सर्वसाधारण प्रवर्गाकरिता राखीव निघाले आहेत.
..................
बॉक्स :
चंद्रकांत ठाकरेंना दिलासा; खानझोडेंना फटका
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर पायउतार झालेले तत्कालिन जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांचा आसेगाव सर्कल सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव निघाल्याने त्यांना दिलासा मिळाला; मात्र तत्कालीन सभापती विजय खानझोडे यांच्या काटा सर्कलमध्ये महिला आरक्षण जाहीर झाल्याने त्यांना फटका बसला आहे. याशिवाय भामदेव सर्कलची धुरा प्रमोद लळे यांच्याकडे होती. तिथेही महिला आरक्षण जाहीर झाले. तसेच भर जहॉँगीर सर्कलमध्ये उषा गरकळ जि.प.सदस्य म्हणून निवडून आल्या होत्या, तिथे आता सर्वसाधारण प्रवर्गाचे आरक्षण निघाल्याने संबंधितांची फसगत झाली आहे.