मंगरूळपीर नगरपरिषदेची आरक्षण सोडत रद्द
By admin | Published: July 5, 2016 12:57 AM2016-07-05T00:57:10+5:302016-07-05T00:57:10+5:30
मंगरूळपीर नगरपरिषदेच्या आरक्षण सोडतीमध्ये तांत्रिक त्रुटी राहिल्यामुळे आरक्षण सोडत रद्द.
वाशिम : राज्य निवडणूक आयोगाने जिल्ह्यातील नगरपरिषदांच्या सार्वत्निक निवडणुकासाठी २ जुलै २0१६ रोजी घेण्यात आलेल्या मंगरूळपीर नगरपरिषदेची प्रभाग रचना व आरक्षण सोडतीमध्ये तांत्निक त्नुटी राहिल्याने ही आरक्षण सोडत जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी अमान्य केली आहे. तसेच ही सोडत रद्द करून आरक्षण सोडतीची प्रक्रिया पुन्हा घेण्यासाठी ७ जुलै २0१६ रोजी दुपारी ४ वाजता मंगरूळपीर तहसील कार्यालयात सभा घेण्याचे निर्देश जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी दिले आहेत. तसेच राज्य निवडणूक आयोगाने जिल्ह्यातील नगरपरिषदांच्या सार्वत्निक निवडणुकासाठी प्रारूप प्रभाग रचना व आरक्षण सोडतीच्या ठरवून दिलेल्या कार्यक्रमानुसार २ जुलै २0१६ रोजी झालेली वाशिम व कारंजा नगरपरिषदेची प्रभाग रचना व आरक्षण सोडत घेण्यात आली आहे. ही प्रभाग रचना आणि प्रवर्ग निहाय तसेच महिला आरक्षण याविषयीची माहिती (परिशिष्ट-३) संबंधित नगर परिषद कार्यालयाच्या व तहसील कार्यालयाच्या नोटीस बोर्डावर ५ जुलै २0१६ ते १४ जुलै २0१६ पर्यंत मतदारांसाठी पाहण्यासाठी उपलब्ध राहील. याबाबत ज्या लोकांना हरकती असतील त्यांनी १४ जुलै २0१६ पर्यंत आपल्या हरकती लेखी स्वरुपात जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर कराव्यात. या तारखेनंतर आलेल्या हरकती विचारात घेतल्या जाणार नाहीत, असे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.