विभाग प्रमुखांच्या निवासस्थानांची दुरवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2020 04:12 PM2020-08-23T16:12:33+5:302020-08-23T16:13:13+5:30
येथे वर्ग एक व वर्ग दोन दर्जाचे अधिकारी येण्यास फारसे उत्सुक नसतात.
लोकमत न्यूज नेटवर्क
मानोरा : येथील तहसिलदार, गटविकास अधिकारी, पोलीस निरीक्षक आदी विभाग प्रमुखांच्या निवासस्थानांचीच दुरावस्था झाल्याने अधिकाºयांना भाडेतत्वावरील घरामध्ये राहण्याची वेळ आली.
जिल्ह्यात मानोरा हा मागासलेला तालुका म्हणून ओळखला जातो. येथे वर्ग एक व वर्ग दोन दर्जाचे अधिकारी येण्यास फारसे उत्सुक नसतात. जे येतात, तेही एक किंवा दोन वर्षातच बदली करून अन्यत्र जातात, या आजवरचा अनुभव आहे. येथे आरोग्य किंवा शैक्षणिकविषयक फारशा सुविधाही उपलब्ध नाहीत. त्यातच अधिकाºयांच्या निवासस्थानांची दुरावस्था झाल्याने भाडेतत्वावरील घर शोधावे लागते. तहसीलदार, पोलिस निरीक्षक, गटविकास अधिकारी यांच्या निवासस्थानांची दुरावस्था झाली तर सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता, लघु पाटबंधारे विभाग, आरोग्य अधिकारी यांना निवासस्थाने नाहीत. त्यामुळे काही अधिकारी अन्य ठिकाणावरून अप-डाऊन करतात तर काही जण भाडेतत्वावरील घरात राहतात. निवासस्थानांची दुरूस्ती करणे आवश्यक ठरत आहे.