राज्यस्तरीय सर्वेक्षणासाठी रिसोड नगर परिषद सज्ज !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2017 02:33 PM2017-12-15T14:33:45+5:302017-12-15T14:37:11+5:30

रिसोड - शहर हगणदरीमुक्तीची घोषणा झाल्यानंतर आता शहर स्वच्छ ठेवण्याचे आव्हान नगर परिषदेला पेलावे लागणार आहे. दरम्यान, स्वच्छतेसंदर्भात २०१८ मध्ये शासनातर्फे शहराचे सर्वेक्षण होणार असून, सर्वेक्षणासाठी नगर परिषद प्रशासन सज्ज असल्याचे दिसून येते. 

Residential City Council ready for statewide survey! | राज्यस्तरीय सर्वेक्षणासाठी रिसोड नगर परिषद सज्ज !

राज्यस्तरीय सर्वेक्षणासाठी रिसोड नगर परिषद सज्ज !

Next
ठळक मुद्देस्वच्छतेसंदर्भात २०१८ मध्ये शासनातर्फे शहराचे सर्वेक्षण होणार आहे.सुरक्षिततेसाठी कर्मचाऱ्यांना हेल्मेट, जॅकेट, हॅन्ड ग्लोज इत्यादी साहित्याचे वितरण गुरूवारी करण्यात आले.


रिसोड - शहर हगणदरीमुक्तीची घोषणा झाल्यानंतर आता शहर स्वच्छ ठेवण्याचे आव्हान नगर परिषदेला पेलावे लागणार आहे. दरम्यान, स्वच्छतेसंदर्भात २०१८ मध्ये शासनातर्फे शहराचे सर्वेक्षण होणार असून, सर्वेक्षणासाठी नगर परिषद प्रशासन सज्ज असल्याचे दिसून येते. 
रिसोड शहराला हगणदरीमुक्त करण्यासाठी तत्कालिन नगराध्यक्ष यशवंत देशमुख व मुख्याधिकारी सुधाकर पानझाडे यांनी सन २०१६-१७ मध्ये सर्व पदाधिकारी, नगर सेवक तसेच शहरवासियांच्या सहकार्यातून विविध उपक्रम राबविले होते. त्या अनुषंगाने सर्वांचेच सहकार्य लाभल्याने रिसोड शहराची हगणदरीमुक्त शहर म्हणून घोषणा करण्यात आली होती. आता शहर स्वच्छ ठेवण्याचे आव्हान आहे. त्या अनुषंगाने कर्मचाºयांना सूचना देण्यात आलेल्या आहेत. सुरक्षिततेसाठी कर्मचाºयांना हेल्मेट, जॅकेट, हॅन्ड ग्लोज इत्यादी साहित्याचे वितरण गुरूवारी करण्यात आले. सन २०१८ मध्ये स्वच्छतेसंदर्भात शासनाकडून शहराचे सर्वेक्षण सुद्धा होणार आहे. या सर्वेक्षणानवरून शहराला स्वच्छतेचे गुणांकन देण्यात येणार आहे. स्पर्धेत टिकण्याबरोबरच शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी नगर परिषदेने कर्मचाºयांचे पथकही गठीत केले आहे. स्वच्छतेविषयी नागरिकांकडून प्राप्त झालेल्या तक्रारींचे १२ तासात निराकरण करण्याचे लक्ष्य आहे, असे मुख्याधिकारी सुधाकर पानझाडे यांनी सांगितले. स्वच्छताविषयक कामे करताना  कर्मचाºयांच्या सुरक्षेची काळजी म्हणून नगर परिषदेतर्फे  प्रत्येक कर्मचाºयाला सुरक्षाविषयक साहित्याचे वितरण केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष भारती क्षिरसागर होत्या. भारती क्षिरसागर यांनी यावेळी स्वच्छतेचे महत्व जाणून स्वच्छतेचा दर्जा वाढविण्यासाठी सर्व कर्मचारी मेहनत करीत आहेतच. परंतु त्याचबरोबर नागरिकांचासुद्धा सामाजिक बांधिलकी म्हणून या अभियानामध्ये समावेश वाढविण्याचा प्रयत्न करावा असे आवाहन केले. मुख्याधिकारी सुधाकर पानझाडे यांनी नगर विकास विभागाने विकसीत केलेल्या स्वच्छता अ‍ँड्राईड अ‍ॅपचा जास्तीत जास्त उपयोग करुन या अभियानात सहभाग नोदंवावा, असे आवाहन केले. कार्यक्रमाला उपाध्यक्षा संगीता मोरे, नगर सेविका पप्पीबाई कदम, सतिष इरतकर, माजी नगराध्यक्ष यशवंत देशमुख,  प्रतिष्ठीत नागरिक अरूण मगर, अरूण  क्षिरसागर, रियाज खान पठान आदींची उपस्थिती होती.


‘स्वच्छता अ‍ॅप’वर तक्रार नोंदविण्याचे आवाहन

केंद्र शासनाच्या नगरविकास खात्याने विकसित केलेल्या ‘स्वच्छता अ‍ॅप’वर नागरिकांना घरबसल्या स्वच्छताविषयक तक्रार नोंदविता येणार आहे. सदर अ‍ॅप डाऊनलोड केल्यानंतर पसंतीची भाषा निवडावी लागणार आहे. अ‍ॅप हा आपला मोबाईल नंबर मागेल, तो योग्य जागी नमूद करावा. तुम्हाला लगेच ‘ओटीपी’ (वन टाईम पासवर्ड) मिळेल. त्यानंतर पहिली तक्रार पोस्ट करा (पोस्ट यूवर फर्स्ट कम्प्लेंट) वर क्लिक करावे लागेल. आता अस्वच्छतेबाबतची तक्रार छायाचित्रासह नोंदवावी. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावर स्क्रीनवर खालीच ‘पोस्ट करा’ शब्द दिसताच, त्यावर क्लिक केले की तक्रार पोहोचल्याचा संदेश दिसणार आहे, अशी माहिती मुख्याधिकारी सुधाकर पानझाडे यांनी दिली. 

Web Title: Residential City Council ready for statewide survey!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.