जादा दराने बियाणे विक्री, कारवाईसाठी मानोरा पं.स.चा ठराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2021 04:27 AM2021-06-29T04:27:22+5:302021-06-29T04:27:22+5:30

यंदाच्या खरीप हंगामात सोयाबीन बियाण्यांचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे. याचा फायदा उचलून काही कृषी सेवा केंद्रचालक जादा दराने ...

Resolution of Manora PNS for sale of seeds at extra rate | जादा दराने बियाणे विक्री, कारवाईसाठी मानोरा पं.स.चा ठराव

जादा दराने बियाणे विक्री, कारवाईसाठी मानोरा पं.स.चा ठराव

Next

यंदाच्या खरीप हंगामात सोयाबीन बियाण्यांचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे. याचा फायदा उचलून काही कृषी सेवा केंद्रचालक जादा दराने सोयाबीन व कपाशीच्या बियाण्यांची विक्री करून शेतकऱ्यांची लूट करीत आहेत. हा प्रकार संतापजनक असून, जादा दराने बियाण्यांची विक्री करणाऱ्या कृषी सेवा केंद्रांवर कारवाईची मागणी शेतकरी वर्गाकडून केली जात होती. मानोरा पंचायत समितीच्या सदस्यांनी शेतकऱ्यांच्या या मागणीची दखल घेत पंचायत समितीच्या मासिक सभेत या संदर्भात ठराव मांडत जादा दराने बियाणे विक्री करणाऱ्यांवर कारवाईची मागणी करण्यात आली. पंचायत समिती सदस्य अभिषेक चव्हाण यांनी मांडले, त्याला अनुमोदन पंचायत समिती सदस्य गोपाल पाटिल भोयर यांनी दिले. सदर ठराव संबंधित विभागाकडे पाठविण्यात आले आहेेत, अशी माहिती पं.स. सदस्य चव्हाण यांनी दिली.

----------------

फुलउमरी मार्गे दिग्रस-मंगरूळपीर

मानोरा तालुक्यात जादा दराने बियाणे विक्री होत असल्याने शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक सुरूच आहे. त्यात ग्रामीण भागांतील काही एसटी बस बंद असल्याने ग्रामस्थांना अडचणी येत आहेत. त्यात फुलउमरी मार्गे दिग्रस-मंगरूळपीर अशी बस बंद असल्याने प्रवाशांना मानोरा शहरासह मंगरूळपीरकडे प्रवास करण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर मानोरा पं.स.च्या मासिक सभेत फुलउमरी मार्गे दिग्रस-मंगरूळपीर ही एसटी बस पूर्ववत सुरू करण्याचाही ठराव घेण्यात आला.

Web Title: Resolution of Manora PNS for sale of seeds at extra rate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.