गाव ‘हगणदरीमुक्त’ करण्याचा महागाववासियांचा संकल्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2017 03:54 PM2017-10-31T15:54:29+5:302017-10-31T15:56:34+5:30
महागाव (वाशिम) - स्वच्छ भारत मिशनअंतर्गत (ग्रामीण) गाव हगणदरीमुक्त करण्याचा संकल्प महागाव येथील ग्रामपंचायत व नागरिकांनी केला आहे. त्या अनुषंगाने पंचायत समितीच्या पदाधिकारी व अधिकाºयांनी गावात हजेरी लावून मार्गदर्शन केले तसेच काही शौचालयांचे भूमिपूजनही केले.
महागाव (वाशिम) - स्वच्छ भारत मिशनअंतर्गत (ग्रामीण) गाव हगणदरीमुक्त करण्याचा संकल्प महागाव येथील ग्रामपंचायत व नागरिकांनी केला आहे. त्या अनुषंगाने पंचायत समितीच्या पदाधिकारी व अधिकाºयांनी गावात हजेरी लावून मार्गदर्शन केले तसेच काही शौचालयांचे भूमिपूजनही केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समितीच्या सभापती छाया सुनील पाटील तर प्रमुख अतिथी म्हणून गटविकास अधिकारी भारसाकळे यांची उपस्थिती होती. गाव स्वच्छ व सुंदर बनविण्याबरोबरच हगणदरीमुक्त करण्यासाठी ग्रामपंचायतने पुढाकार घेतला असून, या कामी नागरिकांनादेखील सहभागी करून घेतले जाणार आहे. सामाजिक आरोग्य तसेच घरातील महिलांची प्रतिष्ठा जपण्यासाठी प्रत्येकाने घरी वैयक्तिक शौचालय बांधकाम करून उघड्यावरील शौचवारीला पायबंद घालावा, असे आवाहन ग्रामपंचायतने केले. गाव हगणदरीमुक्त करून शासनाचा अधिकाधिक निधी विकासात्मक कामांसाठी आणावा, असे आवाहन पंचायत समितीच्या अधिकारी-पदाधिकाºयांनी केले. गावातील काही जणांनी शौचालय बांधकामाला सुरूवात केली. सभापती छाया पाटील यांच्या हस्ते काही शौचालयाचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी नवनिर्वाचित सरपंच अनिल मवाळ, नवनिर्वाचित सदस्य रेखा सदाशिव लांडे, अशोक जमधाडे, नामदेव गायकवाड, ज्ञानेश्वर सरकटे, विलास हुंबाड, सविता गजानन जमधाडे, स्वाती विष्णू बदर, चंद्रकला दिनेश मवाळ, उषा जालिंदर जमधाडे तसेच भगवान गायकवाड, रामदास बदर, बबन बदर, शंकर हुंबाड, हिम्मत हुंबाड, राजू काळे, मोतीराम लांडे, श्रीकिसन काळे, गजानन मवाळ, मनोज मवाळ, भीमराव जमधाडे, मोहन जमधाडे, जनार्धन जमधाडे, रमेश जमधाडे, भोजराज जमधाडे, समाधान जमधाडे, वसंता निळशे, नंदकुमार धाबे, भगवान जमधाडे, गणेश ठाकरे, केशव जाधव यांच्यासह महिला व पुरूषांची उपस्थिती होती.