शिवसेनेत महिला व युवतींना मानसन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2021 04:45 AM2021-08-28T04:45:55+5:302021-08-28T04:45:55+5:30
युवासेना पक्षप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या आदेशानुसार खासदार गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली युवती सेना पदाच्या मुलाखत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ...
युवासेना पक्षप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या आदेशानुसार खासदार गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली युवती सेना पदाच्या मुलाखत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुंबई येथील युवासेना कार्यकारी सदस्य सुप्रदा फातरपेकर होत्या. त्यांनी खासदार भावना गवळी यांच्या नेतृत्वात महिलांनी घराबाहेर पडावे, महिलांच्या समस्या मार्गी लावून त्यांना न्याय देण्यात येईल, तसेच युवतींनी युवती सेनेत सहभागी होऊन संघटना मजबूत करावी, असे आवाहन केले. यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून युवासेना सहसचिव रेणुका विचारे, अकोला जिल्हा शिवसेना महिला आघाडी जिल्हाप्रमुख देवश्री ठाकरे, अकोला महिला उपजिल्हाप्रमुख रेखा राऊत, प्रतिभा महाले, युवासेना जिल्हाप्रमुख रवि भांदुर्गे, शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख मंगला सरनाईक, महिला उपजिल्हाप्रमुख वनिता अलाटे, रामदास मते पाटील, उद्धवराव गोडे, रामदास सुर्वे, बालाजी वानखेडे, गणेश गाभने, संगीता कुटे, सीमा लोखंडे, शिवसेना शहरप्रमुख गजानन भांदुर्गे, ज्योती खोडे, युवासेना शहरप्रमुख गजानन ठेंगडे, सुनीता गव्हाणकर, शिवानी चौधरी, ज्योती नप्ते, रेणुका सुरूशे आदींची उपस्थिती होती. सूत्रसंचालन नारायण ठेंगडे व ऐश्वर्या खोडे यांनी केले. आभारप्रदर्शन शिवानी चौधरी यांनी केले. यशस्वीतेसाठी राजाभैय्या पवार, राजू धोंगडे, बारक्या चोपडे, चेतन इंगोले, माधव नागरे, शिवम घुगे, ज्ञानेश्वर गोरे यांनी परिश्रम घेतले.