वाशिम शहरात जिजाऊ ब्रिगेडच्या संवाद बैठकांना प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2017 01:28 PM2017-10-31T13:28:17+5:302017-10-31T13:29:53+5:30
वाशिम : मराठा सेवा संघ प्रणित महिलांचे वैचारिक संघटन मानल्या जाणाºया जिजाऊ ब्रिगेडच्या संवाद बैठकांना शहरात प्रतिसाद मिळत असून वार्डनिहाय बैठकांचे आयोजन केले जात आहे.
वाशिम : मराठा सेवा संघ प्रणित महिलांचे वैचारिक संघटन मानल्या जाणाºया जिजाऊ ब्रिगेडच्या संवाद बैठकांना शहरात प्रतिसाद मिळत असून वार्डनिहाय बैठकांचे आयोजन केले जात आहे.
जगातील मातृत्वाचा अत्युच्च आदर्श असणाº्या राष्ट्रमाता जिजाऊंना प्रेरणा मानून जिजाऊ ब्रिगेड महिलांकरिता कार्य करीत आहे. राष्ट्रमाता जिजाऊ, महाराणी ताराबाई, राजमाता अहिल्याबाई होळकर, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आदी महानायिकांचा आदर्श व कृती डोळ्यासमोर ठेवून जिजाऊ ब्रिगेडचे काम घराघरांत पोहोचवण्यासाठीचा एक भाग म्हणून जिल्हा कार्यकारिणीच्या निर्णयानुसार गावनिहाय, वार्डनिहाय संवाद बैठका घेण्याचे ठरले. त्यानुसार शहरात मागील दोन दिवसात अकोला नाका, लाखाळा, नंदीपेठ भागात या संवाद बैठका पार पडल्या. महिला व्यक्तीमत्व विकास, संस्कार, शिक्षण, आरोग्य, कौटुंबिक समन्वय आदी विषयांवर या बैठकांमध्ये चर्चा झाली.
या बैठकांना जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्ष संजीवनीताई बाजड यांच्या सोबत माजी जिल्हाध्यक्षा अॅड. छायाताई मवाळ, जिल्हा पदाधिकारी सुरेखाताई आरू, सविताताई बोरकर, वैशालीताई बुंधे, सुनिताताई गोरे व नगर परिषद सदस्या कुसुमताई गोरे यांनी मार्गदर्शन केले तथा संवाद साधला. दोन्ही बैठकांना अंजली शिंदे, सुलोचना जाधव, शारदा बोरकर, चंद्रलेखा इंगोले, अनिता शेळके, भारती शिंदे, शारदा खिल्लारी, सुदेष्णा पिसे, सुनिता परांडे, निर्मला भिसडे, वनमाला शेळके, कावेरी सोमटकर, रिंपल घायाळ, लक्ष्मीबाई देवकर, सुनिता कढणे, वर्षा कव्हर, बेबीताई बुंधे, सिमाताई झामरे, सौ.कावरखे, गुड्डीताई भिसडे, दिव्याताई देशमुख, अनिताताई काळबांडे, विद्याताई लुंगे, अलकाताई बांगर, भारतीताई गोटे, पार्वतीताई गोटे,चारूशील हिरडेकर, सारीका हिरडेकर, आदी महिलांची उपस्थिती होती. संवाद कार्यक्रमाच्या आयोजनासाठी शारदाताई खिल्लारी, वैशालीताई बुंधे, नंदाताई गोटे - खिल्लारी यांनी परिश्रम घेतलेत.