मुग पीक प्रात्याक्षिकास शेतकऱ्यांचा प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2018 05:56 PM2018-08-20T17:56:01+5:302018-08-20T17:57:28+5:30
रिसोड : चालु खरिप हंगामात राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियानातून करडा कृषि विज्ञान केंद्राच्या वतीने तालुक्यातील बोरखेडी या गावात २५ शेतकºयांच्या शेतात मुग पीक प्रात्याक्षिक घेण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
रिसोड : चालु खरिप हंगामात राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियानातून करडा कृषि विज्ञान केंद्राच्या वतीने तालुक्यातील बोरखेडी या गावात २५ शेतकºयांच्या शेतात मुग पीक प्रात्याक्षिक घेण्यात आले. यावेळी कृषी विज्ञान केंद्रातील शास्त्रज्ञांनी निवडक शेतकºयांना मुग लागवडीचे अद्ययावत तंत्रज्ञानाबाबत प्रशिक्षण देवून मार्गदर्शन करण्यात आले.
कडधान्य पीक प्रात्याक्षिकातील लाभार्थी शेतकºयांच्या शेतावरील मुग पीक प्रात्याक्षिकाचे प्रयोग प्रत्यक्ष पाहता यावे, या हेतुने शनिवार, १८ आॅगस्ट रोजी ग्राम पंचायत कार्यालय, बोरखेडी येथील सभागृहात मूग शेती दिन व कृषि चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपसरपंच सुर्यकांत वामनराव सानप होते. प्रमुख पाहुणे म्हणून वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ.आर.एल.काळे, ग्रा.पं.सदस्य तान्हाजी बुधवंत, तंटामुक्ती अध्यक्ष कैलासराव जायभाये, कृषि विज्ञान केंद्रातील तज्ञ मार्गदर्शक आर.एस.डवरे, एस.के.देशमुख व कृषी संजीवनी प्रकल्पातील स्वप्नील गरकळ यांची उपस्थिती लाभली.
कृविकेच्या प्रक्षेत्रावरील प्रात्यक्षिकातून साध्य झालेले घटक व त्यातील संदेशांबाबत शेतकºयांना माहिती देण्यात आली. प्रमुख मार्गदर्शक तथा पीक संरक्षण तज्ज्ञ आर.एस.डवरे यांनी मुग पिकाचे लागवड तंत्र, एकात्मिक कीड व्यवस्थापनाचे फायदे, पीक प्रात्यक्षिकातून शेतकºयांना मिळणारा फायदा तसेच पक्षी थांबे, कामगंध सापळे, टयकोडर्माचा वापर याविषयी सविस्तर मार्गदर्शन करून चालु पीक परिस्थीतीत शेतकºयांनी करावयाच्या उपाययोजनांबाबत माहिती दिली.
एस.के देशमुख यांनी कृषि विज्ञान केंद्रात शेतकºयांना उपलब्ध असलेल्या सुविधांबाबत माहिती देवून ग्रामीण युवकांनी अॅग्रो पॉलीक्लिनीक व अॅग्रो बिझनेस या अभ्यासक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले. क्षेत्र अधिकारी स्वप्नील गरकळ यांनी शेतकºयांच्या शेतावर जावुन सोयाबिन व कापुस पिकावरील मित्र व शत्रु किडीची ओळख व पोक्रा प्रकल्पाची माहिती दिली. तांत्रिक सत्रानंतर ज्ञानेष्वर सोनुने यांच्या मुग पीक प्रात्याक्षिकास शास्त्रज्ञ व शेतकºयांनी भेट देवून पाहणी केली. यावेळी शेतकºयांच्या शंकांचे निरसन करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन आर.एस.डवरे यांनी केले; तर आभार .एस.के.देशमुख यांनी मानले.