नाफेडच्या खरेदीला प्रतिसाद मिळेना: उडिद, मुगाची खरेदी अल्प 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2018 02:50 PM2018-11-23T14:50:10+5:302018-11-23T14:50:22+5:30

वाशिम: नाफेडची सोयाबीन खरेदी अद्याप सुरू झालेली नसताना जिल्ह्यात नाफेडच्या मुग आणि उडिद खरेदीलाही अतिशय अल्प प्रतिसाद मिळाल्याचे दिसत आहे.

Responding to the purchase of Nafed: purchase is very low | नाफेडच्या खरेदीला प्रतिसाद मिळेना: उडिद, मुगाची खरेदी अल्प 

नाफेडच्या खरेदीला प्रतिसाद मिळेना: उडिद, मुगाची खरेदी अल्प 

googlenewsNext


लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: नाफेडची सोयाबीन खरेदी अद्याप सुरू झालेली नसताना जिल्ह्यात नाफेडच्या मुग आणि उडिद खरेदीलाही अतिशय अल्प प्रतिसाद मिळाल्याचे दिसत आहे. मुग आणि उडिदाच्या विक्रीसाठी ७६२४ शेतकºयांनी नोंदणी केली असताना यातील केवळ २४७ शेतकºयांच्या शेतमालाची खरेदी होऊ शकली आहे.
शासनाने यंदा मुगाला ६९७५ रुपये प्रति क्विंटल, तर उडिदाला ५६०० रुपये प्रति क्विंटलचे हमीभाव घोषीत केले असून, शासनााच्यावतीने होणाºया नाफेडच्या खरेदीत २२ नोव्हेंबरपूर्वीच जिल्ह्यातील ६२० शेतकºयांनी मुगाच्या विक्रीसाठी, तर ७००४ शेतकºयांनी उडिदाच्या विक्रीसाठी आॅनलाईन नोंदणीही केली आहे. तथापि, २१ नोव्हेंबर पर्यंत जिल्ह्यात २३० शेतकºयांच्या १३९६.९० क्विंटल उडिदाची, तर १७ शेतकºयांच्या केवळ ६३.६० क्विंटल मुगाची खरेदी नाफेडकडे होऊ शकली आहे. या उलट बाजार समित्यांमध्ये व्यापाºयांकडून उडिदाला कमाल ४८००, तर मुगाला कमाल ५४०० रुपये प्रति क्विंटलचे दर मिळत असतानाही शेतकरी नाफेडऐवजी व्यापाºयांकडेच उडिद मुग विक्रीला प्राधान्य देत असल्याचे बाजार समित्यांत होणाºया मुग आणि उडिदाच्या आवकीवरून स्पष्ट होत आहे. 

चुकाºयास होणारा विलंब कारणीभूत
गत दोन तीन वर्षांत शासकीय खरेदी केंद्रांवर शेतकºयांचा भ्रमनिरास झाला. या केंद्रांवर मालमोजणीसाठी होणारा विलंब, त्यामुळे चार चार दिवस होणारा मुक्काम आणि एवढे करूनही विकलेल्या शेतमालाच्या चुकाºयासाठी करावी लागणारी महिनोगणतीची प्रतिक्षा, आदि कारणांमुळे शेतकºयांनी शासकीय खरेदी केंद्रांकडे पाठ केली आहे. प्रत्यक्षात शासनाचे यंदाचे मुगाचे हमीभाव आणि बाजारात मिळत असलेल्या दरात जवळपास प्रति क्विंटल मागे १६०० रुपयांची तफावत आहे, तर उडिदाच्या दरात सहाशे ते आठशे रुपयांची तफावत आहे, असे असतानाही नैसर्गिक आपत्तीने अडचणीत सापडलेल्या शेतकºयांना विकलेल्या शेतमालाचा हातोहात पैसा हवा असल्याने शासकीय खरेदी केंद्र ओस पडले आहेत.

Web Title: Responding to the purchase of Nafed: purchase is very low

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.