वित्तीय साक्षरता कार्यशाळेस प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2021 04:35 AM2021-02-15T04:35:17+5:302021-02-15T04:35:17+5:30
भारतीय रिझर्व्ह बँकेने ८ ते १२ फेब्रुवारी या कालावधीत सर्वत्र वित्तीय साक्षरता अभियान राबविण्याच्या सूचना दिल्या होत्या. याअंतर्गत सर्व ...
भारतीय रिझर्व्ह बँकेने ८ ते १२ फेब्रुवारी या कालावधीत सर्वत्र वित्तीय साक्षरता अभियान राबविण्याच्या सूचना दिल्या होत्या. याअंतर्गत सर्व बँकांनी वित्तीय साक्षरता मेळावे घेण्याचे आदेश होते. त्यानुसार विदर्भ कोकण ग्रामीण बँकेच्या वतीने व्याड येथे मेळावा घेण्यात आला. यावेळी शाखा व्यवस्थापक तेलगावकर यांनी मार्गदर्शन केले. नाबार्डचे शाखा व्यवस्थापक विजय खंडारे यांनी शेतकऱ्यांना कृषी क्रेडिट कार्ड, पीक कर्ज, शेतीपूरक कर्ज आणि शेती करण्यासाठीचे नियोजन आदींबाबत माहिती दिली. ‘मनीवाईज’चे गवळी आणि किशोर चक्रनारायण यांनी प्रधानमंत्री सुरक्षा योजना, जीवन ज्योती विमा योजना, अटल पेन्शन योजनेबद्दल मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे आयोजन बँक सखी अलका सुर्वे, रोहिणी जोशी, बंडू मसारे यांनी केले. सारंग नायगावकर, कन्हैया कंकाळ, राजू ढोणे यांचे याकामी सहकार्य लाभले.