‘कोरोना : मी व माझी जबाबदारी’ विषयावरील व्याख्यानास प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 04:40 AM2021-05-14T04:40:31+5:302021-05-14T04:40:31+5:30
कार्यक्रमाचे उद्घाटन राष्ट्रीय सेवा योजनेचे विभागीय समन्वयक प्रा. विशाल जाधव यांनी केले. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा समन्वयक प्रा. डाॅ. ...
कार्यक्रमाचे उद्घाटन राष्ट्रीय सेवा योजनेचे विभागीय समन्वयक प्रा. विशाल जाधव यांनी केले. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा समन्वयक प्रा. डाॅ. योगेश पोहोकार, प्रा. विलास गांजरे यांची उपस्थिती लाभली. प्रमुख वक्ते म्हणून ‘अंनिस’चे पंकज वंजारे होते. युवा शाखेच्या फेसबुक पेजवर ‘स्ट्रीमयार्ड’च्या माध्यमातून पार पडलेल्या व्याख्यानाच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक नीलेश मिसाळ यांनी केले. यावेळी प्रा. विशाल जाधव म्हणाले की, कोरोनाकाळात प्रामुख्याने विद्यार्थ्यांकरिता समुपदेशनपर व्याख्यान आयोजन सर्वप्रथमच केले जात आहे. त्यास विद्यार्थी व पालकांमधून चांगला प्रतिसाद मिळाल्याचे त्यांनी सांगितले. प्रा. विलास गांजरे, प्रा. डाॅ. पोहोकार यांनी विचार व्यक्त केले. सेजल शशिकांत फेंडर या विद्यार्थिनीने वक्त्यांचा परिचय करून दिला.
कोरोनाच्या काळात विद्यार्थ्यांनी स्वत:सोबतच कुटुंब, समाज व देशाप्रती असलेल्या जबाबदारीचे भान ठेवावे. कुटुंबातील सदस्यांचे मानसिक संतुलन राखण्यासाठी काय करावे, याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. गावोगावच्या युवकांनी एकत्र येऊन ‘आरोग्य सेवा युवा मंडळ’ स्थापन करावे व या माध्यमातून गरजूंना आरोग्यविषयक सेवा पुरविण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन करण्यात आले. संचालन युवराज राठोड व सुमित उगेमुगे यांनी केले. आभार प्रदर्शन गार्गी पांडे हिने केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी हर्षाली लोहकरे, रिंकेश भिसे, प्रा. अविनाश खिल्लारे, आदींनी पुढाकार घेतला.