‘माझे घर, माझा हक्क’ मोहिमेस प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2021 04:25 AM2021-07-12T04:25:39+5:302021-07-12T04:25:39+5:30
तहसीलदार शारदा जाधव यांनी या मोहिमेत सहभागी होऊन लाभ घ्यावा, असे आवाहन केले होते. शिधापत्रिकांमधे दुरुस्ती करणे, मयत नावे ...
तहसीलदार शारदा जाधव यांनी या मोहिमेत सहभागी होऊन लाभ घ्यावा, असे आवाहन केले होते. शिधापत्रिकांमधे दुरुस्ती करणे, मयत नावे वगळणे, कमी करणे आदी उद्देशांनी ही मोहीम हाती घेण्यात आली आहे. ऑनलाइन अर्ज करून आणि आवश्यक कागदपत्रे देऊन शिधापत्रिकांमधील त्रुटी दूर होऊ शकते. त्यामुळे अनेक कुटुंब प्रमुख शिधापत्रिकांमधे दुरस्ती करीत असताना दिसून येत आहे. याकामी पुरवठा निरीक्षक, कर्मचारी प्रयत्न करीत आहेत.
..................
कोट :
शिधापत्रिका हा दस्तावेज प्रत्येक कुटुंबासाठी महत्त्वपूर्ण आहे. त्यामुळे शिधापत्रिका अचूकच असायला हवी. त्यानुषंगाने मोहीम हाती घेण्यात आली आहे. येत्या १७ जुलैपर्यंत मोहीम सुरू राहणार आहे. शहर व तालुक्यातील नागरिकांनी शिधापत्रिकांमध्ये दुरुस्ती करून घ्यावी.
- आर. एस. खेडकर
पुरवठा निरीक्षक, मानोरा