महिला नेतृत्व विकास प्रशिक्षण शिबिरास प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2021 04:20 AM2021-01-24T04:20:29+5:302021-01-24T04:20:29+5:30
महाराष्ट् राज्य औद्योगिक महिला सहकारी संस्था महासंघ व नवदुर्गा बहुउद्देशिय महिला मंडळ, मेडशीच्या संयुक्त विद्यमाने माता कमलेश्वरी संस्थान येथे ...
महाराष्ट् राज्य औद्योगिक महिला सहकारी संस्था महासंघ व नवदुर्गा बहुउद्देशिय महिला मंडळ, मेडशीच्या संयुक्त विद्यमाने माता कमलेश्वरी संस्थान येथे प्रशिक्षण शिबिर पार पडले. ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचे जिल्हा समन्वयक सुधीर खुजे यांनी उद्घाटन केले. अध्यक्षस्थानी डॉ. वाणी होते. प्रमुख पाहुणे म्हणून शुभांगी वाटाने, नंदा गणोजे, सविता गोंडाळ, राधा केदार, गणेश खोलगडे यांची उपस्थिती होती. संचालिका रेखा खोत यांनी प्रास्ताविकातून महिलांनी सक्षम होण्याचा सल्ला दिला. सुधीर खुजे यांनी महिलांनी मोठी स्वप्न पाहून ती साकार करण्यासाठी झटायला हवे, असे आवाहन केले. डॉ. वाणी यांनी महिलांना आरोग्यविषयक माहिती दिली. गणेश खोलगडे, प्रिया पाठक यांचीही भाषणे झाली. सूत्रसंचालन आशा तायडे यांनी केले. मीना गोंडाळ यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उमेद अभियानाच्या प्रतिभा घुगे, विजया पटोकार, संगीता नालिंदे, मीनाक्षी हवा आदिंनी पुढाकार घेतला.