मानोरा येथे रेस्टॉरंटमधून दारू जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2017 01:12 AM2017-08-03T01:12:29+5:302017-08-03T01:14:12+5:30

मानोरा :  मानोरा शहरात मंगरुळपीर रोडवर असलेल्या  आशिष रेस्टॉरंटवर मंगळवार, १ ऑगस्टच्या रात्री टाकलेल्या  धाडीत २९ हजार ७0७ रुपयांची विदेशी दारू पोलीस  निरीक्षक रामकृ ष्ण मळघने यांनी जप्त केली.

At the restaurant at Monaro seized liquor | मानोरा येथे रेस्टॉरंटमधून दारू जप्त

मानोरा येथे रेस्टॉरंटमधून दारू जप्त

Next
ठळक मुद्दे२९ हजार ७0७ रुपयांची विदेशी दारू जप्त मंगरुळपीर रोडवर असलेल्या ‘आशिष रेस्टॉरंट’मंगळवारी रात्री टाकली धाड 

लोकमत न्यूज नेटवर्क
मानोरा :  मानोरा शहरात मंगरुळपीर रोडवर असलेल्या  आशिष रेस्टॉरंटवर मंगळवार, १ ऑगस्टच्या रात्री टाकलेल्या  धाडीत २९ हजार ७0७ रुपयांची विदेशी दारू पोलीस  निरीक्षक रामकृ ष्ण मळघने यांनी जप्त केली. सलग दुसर्‍यांदा  शहरात पडलेल्या धाडीमुळे अवैधरीत्या चालणार्‍या बार  मालकांचे धाबे दणाणले आहेत. 
न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य व राष्ट्रीय महामार्गालगत  असलेल्या ५00 मीटर आतील वाईन बारला  परवानगी  नाकारली. नेमका याचाच फायदा घेत छुप्या मार्गाने  अव्वाच्या सव्वा भाव घेत देशी, विदेशी, हातभट्टी दारूची  सहज विक्री होत आहे. 
शहरात बंदी असतानासुद्धा सहज दारु उपलब्ध होते. प्रसार  माध्यमांनी ही गंभीर बाब उघड केली. शहरातील आशिष  रेस्टॉरंटवर विदेशी दारूची सर्रास विक्री होत असल्याची गो पनीय माहिती मिळताच पोलीस निरीक्षक रामकृष्ण मळघने,  पोलीस उपनिरीक्षक राहुल काटकाडे, धर्माजी डाखोरे,  विश्‍वास वानखडे या चार अधिकार्‍यांच्या पथकाने धाड  टाकून आरोपी अविनाश प्रल्हाद वीर यांच्याकडून रात्री १0  ते ११ च्या दरम्यान पंचासमक्ष २९ हजार ७0७ रुपयांची  विदेशी दारू जप्त केली. याआधी दुसर्‍या रेस्टॉरंटवर मानोरा  पोलिसांनी धाड टाकून विदेशी दारू जप्त केली होती.  त्यामुळे अवैध दारू विक्री करणार्‍यांच्या मनात धास्ती  निर्माण झाली आहे.

दीड लाखांच्या दारूसंदर्भात राज्य उत्पादन शुल्क विभागास  पत्र
आशिष रेस्टॉरंटमध्ये टाकलेल्या धाडीदरम्यान परवाना  गोडावूनच्या प्रवेश व्दाराला सीलबंद असल्यामुळे त्याच  खोलीचा दुसरा दरवाजा उघडून लाखो रुपयांचा माल मानोरा  पोलिसांनी ताब्यात घेतला. ताब्यात घेतलेला माल हा राज्य  उत्पादन शुल्क विभागाचा असल्याचे रेस्टॉरंट मालकाने  सांगितल्यामुळे मानोरा पोलिसांनी संबंधित विभागाला पत्र  व्यवहार केल्याची माहिती पोलीस निरीक्षक रामकृष्ण  मळघने यांनी दिली.
 

Web Title: At the restaurant at Monaro seized liquor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.