घरकुल योजनेला रेतीघाटांचा लगाम
By admin | Published: November 25, 2015 02:20 AM2015-11-25T02:20:41+5:302015-11-25T02:20:41+5:30
शासनाच्या शौचालय बांधकामातही अडथळा.
संतोष वानखडे / वाशिम : हगणदरीमुक्तीचा संकल्प घेऊन निघालेल्या जिल्हा परिषद प्रशासनाला शौचालय बांधकामात, रखडलेल्या रेतीघाट लिलावाचा मोठा अडसर ठरत आहे. यामुळे अनेक घरकुल आणि शौचालय बांधकामाचे बांधकाम ठप्प असून, उद्दिष्टपूर्तीसाठी लाभार्थ्यांंना नाइलाजास्तव अवैध रेती वाहतुकीकडे वळावे लागत आहे.
हगणदरीमुक्तीबरोबरच स्वच्छ व सुंदर गावाची संकल्पना साकार करण्यासाठी स्वच्छ भारत अभियान राबविले जात आहे. या अभियानांतर्गत शौचालय बांधकाम करण्याला प्रथम प्राधान्य दिले जात आहे. सन २0१५-१६ या वर्षात वाशिम जिल्हय़ात २५ हजार शौचालय बांधकाम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट मिळाले आहे. ९ ऑगस्ट २0१५ पासून जिल्हा परिषदेने ह्यसंपूर्ण स्वच्छतेची ऑगस्ट क्रांतीह्ण या नावाने शौचालय बांधकामाची मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेला लोकचळवळीचे स्वरूप देण्याचा प्रयत्न सुरू असतानाच, नेमके रेतीघाटाचा रखडलेला लिलाव ह्यगतिरोधकह्ण निर्माण करीत आहे. कारंजा तालुक्यात १४ हजार ३४७ घरकुलांचे उद्दिष्ट असून, आतापर्यंंत १५00 घरकुलांचे काम पूर्ण झाले. जिल्हय़ात २0१५-१६ या वर्षात ऑक्टोबरअखेर पाच हजार शौचालयांचे बांधकाम झाले; मात्र रेतीघाट बंद असल्याने रेती आली कुठून, हा संशोधनाचा विषय ठरत आहे. अवैध मार्गाने रेती चोरून आणलेल्या काही लाभार्थ्यांंना दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागले.
*शासनाच्याच दोन विभागात असमन्वय
महसूल व गौण खनिज विभागाच्या नियमानुसार शक्यतोवर नोव्हेंबर महिन्यात रेतीघाटाचा लिलाव केला जातो. तर दुसरीकडे जिल्हा परिषदेच्या शौचालय व घरकुल बांधकाम मोहिमेला तोपर्यंंत सुरुवातही झालेली असते. रेतीघाटाचे लिलाव बंद असतानाही, दुसरीकडे मात्र शौचालय व घरकुलांचे बांधकाम सुरू असते.