लोकसहभागातून मंदिराचा जीर्णोद्धार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 05:07 AM2021-05-05T05:07:45+5:302021-05-05T05:07:45+5:30
वाशिम जिल्ह्यातील शिरपूर जैन येथे इंग्रजकालीन पोलीस ठाणे आहे. त्याच्याही पूर्वीपासून पोलीस ठाण्याच्या मागच्या बाजूला बजरंग बलीचे मंदिर आहे. ...
वाशिम जिल्ह्यातील शिरपूर जैन येथे इंग्रजकालीन पोलीस ठाणे आहे. त्याच्याही पूर्वीपासून पोलीस ठाण्याच्या मागच्या बाजूला बजरंग बलीचे मंदिर आहे. हे मंदिर अडगळीत पडल्यासारखे होते. या मंदिरामध्ये पोळ्याला बैलांना प्रदक्षिणा व दर्शनासाठी आणले जाते. मध्यंतरी या मंदिराची काही दुरुस्ती करण्यात आली होती. मागील सात-आठ वर्षांपासून पुन्हा हे मंदिर अडगळीत पडल्यासारखे होते. या मंदिराचा जीर्णोद्धार करणे गरजेचे होते. ही संकल्पना डोक्यात घेऊन पोलीस निरीक्षक सुनील वानखेडे यांनी मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचे ठरविले. त्यांना गावातील लोकांनीही मोठे सहकार्य केले. हनुमान जयंतीपासून मंदिराचे काम सुरू करण्यात आले. मंदिराची दुरुस्ती करून रंगरंगोटी करण्यात आली. मंदिर परिसरात पेव्हर ब्लॉक बसविण्याचे काम सुरू आहे. मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी पोलीस निरीक्षक वानखेडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.