नियमबाह्य वाहतुकीला लगाम : मानोरा तालुक्यात ३३ वाहनांवर कारवाई!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2017 07:29 PM2017-12-31T19:29:30+5:302017-12-31T19:31:54+5:30

मानोरा: स्थानिक पोलीस प्रशासनाने अवैध आणि नियमबाह्य वाहतुकीसह कागदपत्रे न बाळगणार्‍या वाहनधारकांवर कारवाईची मोहिम सुरू केली आहे. या अंतर्गत रविवार ३१ डिसेंबर रोजी सायंकाळपर्यंत ३३ वाहनांवर पोलिसांनी कारवाई केली. 

Restraint on the outside traffic: Action on 33 vehicles in Manora taluka! | नियमबाह्य वाहतुकीला लगाम : मानोरा तालुक्यात ३३ वाहनांवर कारवाई!

नियमबाह्य वाहतुकीला लगाम : मानोरा तालुक्यात ३३ वाहनांवर कारवाई!

Next
ठळक मुद्देस्थानिक पोलीस प्रशासनाची मोहिम

लोकमत न्यूज नेटवर्क
मानोरा (वाशिम): स्थानिक पोलीस प्रशासनाने अवैध आणि नियमबाह्य वाहतुकीसह कागदपत्रे न बाळगणार्‍या वाहनधारकांवर कारवाईची मोहिम सुरू केली आहे. या अंतर्गत रविवार ३१ डिसेंबर रोजी सायंकाळपर्यंत ३३ वाहनांवर पोलिसांनी कारवाई केली. 
मानोरा तालुक्यात पोलिसांनी वाहनांवर राबविलेल्या मोहिमेत ३१ डिसेंबर रोजी ग्रामीण भागातून शहरात येणाºया वाहनांसह मानोरा-दिग्रस-मंगरुळपीर मार्गावरील वाहनांची तपासणी करून नियमांचे उल्लंघन करणा-यांवर कारवाई करण्यात आली. यावेळी क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी वाहतूक करणारी आणि कागदपत्र न बाळगणा-या ३३ वाहनचालकांवर मोटार वाहन अ‍ॅक्ट ६८/१८३ कलमानुसार कारवाई करण्यात आली. यासाठी ठाणेदार रामकृष्ण मळघणे यांच्या मार्गदर्शनात मानोरा पोलिसांनी सर्वच मार्गावर ठाण मांडले होते. 

Web Title: Restraint on the outside traffic: Action on 33 vehicles in Manora taluka!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.