मालेगाव शहरात प्रतिबंधित क्षेत्र उरले नावाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 04:41 AM2021-04-24T04:41:55+5:302021-04-24T04:41:55+5:30
यापूर्वी कोरोना रुग्ण निघाला तर त्या घरातील लोकांची किंवा संपर्कातील नागरिकांची चाचणी केली जात होती. आता मात्र सर्वांची चाचणी ...
यापूर्वी कोरोना रुग्ण निघाला तर त्या घरातील लोकांची किंवा संपर्कातील नागरिकांची चाचणी केली जात होती. आता मात्र सर्वांची चाचणी केली जात नसल्याने कोरोना संसर्ग अधिक गतीने पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही. गृहविलगीकरणातून बाहेर पडत घराबाहेर फिरणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी जोर धरत आहे.
काही आजारामुळे तसेच काही लक्षणे दिसल्यामुळे अनेक लोक चाचणी करीत आहेत. मात्र चाचणीचा निकाल येइपर्यंत त्यांना गृहविलगीकरणात राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत तसेच काही लोक पाॅझिटिव्ह निघत आहेत. पण मला काही त्रास नाही असे म्हणत बाहेर वावरत आहेत. वास्तविक अशा लोकांना कुठल्याही परिस्थितीत घरातील एका खोलीत स्वत:ला एकटे करून घ्यायचे आहे. कुटुंबातील इतर सदस्यांच्या संपर्कात यायचे नाही. मात्र अनेक लोक चाचणी केल्यानंतर अहवाल पाॅझिटिव्ह येऊनही बिनधास्त फिरत असल्याचे दिसून येते. अशा प्रकारामुळेच मागे खासगी डॉक्टरांनीसुद्धा ओपीडी बंद केली होती. हा प्रकार संबंधिताच्या कुटुंबासाठीच नव्हे तर नागरिकांसाठीही धोकादायक आहे. तेव्हा अशा लोकांविरुद्ध कडक कारवाईची गरज आहे
इनबॉक्स
कोरोना संसर्ग झालेली व्यक्ती आजकाल बिनधास्तपणे फिरत आहे. यापूर्वी त्यांच्यावर लक्ष ठेवल्या जात होते. मात्र आता काहीच कारवाई केल्या जात नाही. त्या व्यक्तीकडून हमीपत्र भरून घ्यावे आणि त्या व्यक्तीला बाहेर फिरण्यास मज्जाव करावा म्हणजे तो इतरांना संसर्ग करणार नाही.
डॉ. विवेक माने मालेगाव