निर्बंध लागू; शिकवणी वर्ग बंदच !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:45 AM2021-07-14T04:45:46+5:302021-07-14T04:45:46+5:30
कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून तिसऱ्या स्तरातील निर्बंध जिल्ह्यात लागू आहेत. १२ जुलैपासून पुढील आदेशापर्यंत निर्बंधाला मुदतवाढ ...
कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून तिसऱ्या स्तरातील निर्बंध जिल्ह्यात लागू आहेत. १२ जुलैपासून पुढील आदेशापर्यंत निर्बंधाला मुदतवाढ देण्यात आली असून, यापूर्वीच्या नियमावलीत कोणताही बदल नाही. दरम्यान, जीम, सलून ५० टक्के क्षमतेने सुरू आहेत तसेच सार्वजनिक ठिकाणे, क्रीडांगणे, मोकळ्या जागा, उद्याने, बगीचे, मॉर्निंग वॉक व सायकलिंगला सकाळी ५ ते सकाळी ९ वाजेपर्यंत मुभा दिली. याच धर्तीवर खासगी शिकवणी वर्ग सुरू करण्यास मुभा देण्यात यावी, अशी मागणी संचालकांमधून होत आहे.
००००००००
कोट
काही अटी व शर्तींवर इतर कार्यक्रम, व्यवसायांना मुभा दिली आहे. याच धर्तीवर खासगी कोचिंग क्लासेसलादेखील मुभा मिळणे अपेक्षित आहे.
- प्रा. रोहिदास बांगर,
संचालक, कोचिंग क्लासेस
०००००
स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून काही अटींवर खासगी कोचिंग क्लासेसला परवानगी द्यावी, अशी संघटनेची मागणी आहे.
- प्रा. पंकजकुमार बांडे,
संचालक, कोचिंग क्लासेस