मंगरुळपीर तालुक्याचा निकाल ९१.३७ टक्के!
By admin | Published: May 31, 2017 02:07 AM2017-05-31T02:07:29+5:302017-05-31T02:07:29+5:30
मंगरुळपीर : १२ वी परिक्षेचा निकाल आज रोजी घोषीत झाला असून यामध्ये मंगरुळपीर तालुक्याचा ९१.३७ टक्के एवढा निकाल लागला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मंगरुळपीर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक मंडळाव्दारे फेब्रुवारी मार्च मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता १२ वी परिक्षेचा निकाल आज रोजी घोषीत झाला असून यामध्ये मंगरुळपीर तालुक्याचा ९१.३७ टक्के एवढा निकाल लागला आहे.
तालुक्यात एकुण २३९१ विदयार्थ्यांनी फार्म भरले होते. त्यापैकी २३८९ विद्यार्थी परीक्षेला बसले होते त्यामधून २१८३ विदयार्थी उत्तीर्ण झाले असून निकालाची टक्केवारी ९१.३७ अशी आहे. मागील वर्षी तालुक्याचा निकाल ८७.६१ टक्के होता. त्यामध्ये यंदा ३.७६ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
तालुक्यातील एकूण १९ कनिष्ठ महाविद्यालयातील विज्ञान कला, वाणिज्य व एमसीव्हीसी व व्होकेशनल शाखेतील एकूण २३८९ विद्यार्थ्यांनी परिक्षा दिली होती त्यापैकी २१८३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून प्रविण्यश्रेणीत ५७, ‘अ’ श्रेणीमध्ये ७६५ तर ‘ब’ श्रेणीमध्ये १२०० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तालुक्यातील १९ कनिष्ठ महाविद्यालयापैकी १८ कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल ७६ टक्केच्या वर लागला असून मातोश्री पार्वताबाई कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल ६५.३८ एवढा लागला आहे. सर्व शाखेतून सर्वात जास्त निकाल लागण्याचा मान लक्ष्मीचंद क. महाविद्यालय, शेलूबाजारला मिळाला असून त्यांचा निकाल ९९.५५ टक्के एवढा लागला आहे तालुक्यातील ८ विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयांपैकी लक्ष्मीचंद क.म. शेलूबाजार, एम.सी.ठाकरे क. महाविद्यालय कासोळा व यशवंतराव चव्हाण क. महाविद्यालय मंगरुळपीर या तीन महाविद्यालयांचा निकाल १०० टक्के लागला असून उर्वरीत पाच कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल सुद्धा ९० टक्केचा वर लागला आहे वाणिज्य शाखेतून वसंतराव नाईक क.म. मंगरुळपीर व लक्ष्मीचंद क. महाविद्याय शेलूबाजार या दोन कनिष्ठ महाविद्यालयाचा १०० टक्के एवढा निकाल लागला आहे.
तालुक्यातील विज्ञान कला व वाणिज्य शाखेतील क.म.चा एकत्रीत निकाल पुढील प्रमाणे आहे. सुधाकर नाईक क.म. मंगरुळपीर ८०.१५ टक्के, जि.प.क.म.मंगरुळपीर ९७.५९ वसंतराव नाईक क.म. मंगरुळपीर ९०.४७ टक्के, शिवाजी क.म. वनोजा ९३.१८ टक्के, कलंदरीया उर्दु क़म. मंगरूळपीर ९०.१६ टक्के, धानोरकर भादर्श क़म. धानोरा खुर्द ९४.५३ टक्के,लक्षमीचंद क.म. शेलूबाजार ९९.५५ टक्के, ब्रम्हानंदगिरी क.म.मोहरी ७६.१९ टक्के, श्रीमती साळुंकाबाई राउत क.म. वनोजा ७९ टक्के, भगवंतराव महाकाळ क.म. मानोरा९०.५८ टक्के, जनता क.म. कवठळ ९०.९० टक्के, एम.सि.ठाकरे क.म. कासोळा ९०.०४ टक्के, अविनाश क.म. मंगरुळपीर ८० टक्के, एन.बी.शेळके क.म.कुंभी ८७.१५ टक्के, यशवंतराव चव्हाण क.म. मंगरुळपीर ९८.८५ टक्के, मुरलीधर इंगोले क.म. कंझरा ९७.१४ टक्के, मातोश्री पार्वतीबाई महाविद्यालय मंगरुळपीर ६५.३८ टक्के, मौलाना अ.कलाम उर्दु क.म. आसेगाव ९२ टक्के, मधुकरराव सपकाळ क.म. पिंप्री बु ९१.६६ टक्के, तालुक्यातील व्होकेशनल विषयाचा क.महाविद्यालयाचा निकाल पुढील प्रमाणे धानोरकर आदर्श क.म. धोनारा खुर्द ९६.७२ टक्के,लक्ष्मीचंद क.म. शेलूबाजार ९६.२९ टक्के, श्रीमती साळूंकाबाई राउत क.म. वनोजा ९१.४८ टक्के, भगवंतराव महाकाळ क.म. मानोली ९५.९४, श्री एम.सी. ठाकरे क.म. कासोळा ८२.१५, आज रोजी लागलेल्या निकालामध्ये यशस्वी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे त्यांचे गुरुजनवर्ग, आई वडील, चाहते मित्र परिवार व नातेवाईकाकडून अभिनंदन करण्यात आले.