भरपावसात कामरगाव येथील देशीदारू दुकान हटविण्यासाठीचे उपोषण सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:46 AM2021-07-14T04:46:44+5:302021-07-14T04:46:44+5:30
दरम्यान ११ जुलै रोजी कामरगाव येथे मेघगर्जनेसह पावसाने हजेरी लावली. या पावसात देखील हे उपोषण सुरूच असल्याने उपोषणकर्ते ...
दरम्यान ११ जुलै रोजी कामरगाव येथे मेघगर्जनेसह पावसाने हजेरी लावली. या पावसात देखील हे उपोषण सुरूच असल्याने उपोषणकर्ते यांचे हाल झालेत. १२ जुलै रोजी प्रहार संघटनेच्या कार्यकर्ते यांनी कामरगाव येथे जाऊन उपोषण मंडपास भेट दिली व उपोषणास जाहीर पाठिंबा दर्शविला. कामरगाव येथील हे देशी दारूचे दुकान हटविण्यासाठी आतापर्यंत बचत गटाच्या महिलांनी व भुलोडा येथील तंटामुक्ती अध्यक्ष विनोद नंदागवळी यांनी सुध्दा आमरण उपोषणाचे शस्त्र उगारले होते. परंतु त्याचा सुध्दा काहीही फायदा न झाल्याने दुकान जैसे थे आहे. सामाजिक कार्यकर्ते प्रकाश इंगळे यांनी विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन हे दारूचे दुकान हटविण्यासाठी उपोषण सुरू केले आहे. या उपोषणास कामरगावसह परिसरातील नागरिकांचा वाढता पाठिंबा मिळत आहे. आतापर्यंत जवळपास १ हजार लोकांनी उपोषण मंडपास भेट देऊन व स्वाक्षऱ्या करून पाठिंबा दर्शविला. प्रहार संघटनेने महेश राऊत यांच्या नेतृत्वात या उपोषणास पाठिंबा दर्शविला असून यावेळी कार्यकर्ते यांची उपस्थिती होती.