कुटुंब व बालकल्याण योजनेच्या सेवानिवृत्तांना न्याय मिळवून देणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 05:56 AM2021-02-20T05:56:49+5:302021-02-20T05:56:49+5:30
आमदार सरनाईक यांनी आमदारकी मिळविल्यानंतर कुटुंब बालकल्याण योजनेचे सेवानिवृत्त लेखापाल वयोवृद्ध हुकूमचन्द बागरेचा यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांचा आशीर्वाद ...
आमदार सरनाईक यांनी आमदारकी मिळविल्यानंतर कुटुंब बालकल्याण योजनेचे सेवानिवृत्त लेखापाल वयोवृद्ध हुकूमचन्द बागरेचा यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांचा आशीर्वाद घेतला. याप्रसंगी त्यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत कुटुंब व बालकल्याण योजनेतील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांवर सुरवातीपासूनच खूप मोठा अन्याय झाल्याची कल्पना आपणास पूर्वीपासून असल्याचे सांगितले. राज्य शासनाने सेवानिवृत्त योजना कर्मचाऱ्यांना पाचवा वेतन तब्बल १२ वर्षे उशिरा दिला तर सहावा वेतन साडेपाच वर्षानंतर त्यांना लागू करण्यात आला असून सातवा वेतन सुद्धा अद्याप पर्यंत लागू करण्यात आलेला नाही . या सर्व बाबींची आपणास जाण असून आपण पाचव्या व सहाव्या वेतनाच्या थकीत रकमेची मागणी तसेच सातवा वेतन लागू करण्यासाठी सरकारदरबारी आपण पाठपुरावा करून राज्यातील कुटुंब व बालकल्याण योजनेच्या सर्व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना याचा लाभ आपण मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहू असे अभिवचन आमदार सरनाईक यांनी सेवानिवृत्त बागरेचा यांना दिले. याप्रसंगी आमदार किरणराव सरनाईक यांचे शाल देऊन स्वागत करण्यात आले.यावेळी बागरेचा यांनी सरनाईक यांना आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले.या निवेदनावर वाशिम,अकोला, अमरावती,यवतमाळ, मुंबई तसेच राज्यातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी स्वाक्षऱ्या स्वाक्षऱ्या केल्या आहेत.याप्रसंगी शिक्षण संस्थाचालक संघटनेचे अध्यक्ष भाऊसाहेब सोमटकर,नारायणराव काळबांडे,प्रा.डॉ.दादाराव देशमुख आदी उपस्थित होते.