खापरदरी येथील व्यायामशाळेचे अनुदान सव्याज परत करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2021 04:38 AM2021-03-07T04:38:26+5:302021-03-07T04:38:26+5:30
खापरदरी येथे व्यायाम शाळा उभारणीसाठी संत गाडगेबाबा बहुउद्देशीय संस्थेला २०११-१२ मध्ये जिल्हा क्रीडा कार्यालय, वाशिम येथून दोन लाख रुपयांचे ...
खापरदरी येथे व्यायाम शाळा उभारणीसाठी संत गाडगेबाबा बहुउद्देशीय संस्थेला २०११-१२ मध्ये जिल्हा क्रीडा कार्यालय, वाशिम येथून दोन लाख रुपयांचे अनुदान देण्यात आले होते. संबंधित व्यायाम शाळेचे अध्यक्ष वसंत आलुसिंग चव्हाण यांनी या अनुदानाचा गैरवापर करून स्वत:चे घर उभारले व व्यायामशाळेसाठी आलेला निधी आपल्याच घशात घातला. तसेच व्यायामशाळेच्या साहित्यासाठी साधे प्रस्तावदेखील सादर केले नाही. यासंबंधी गावातील महानायक वसंतराव नाईक युवक मंडळाने जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांकडे धाव घेऊन व्यायाम शाळा सुरू करून देण्याची मागणी केली. चाैकशीअंती जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांनी याबाबतीत आक्रमक पवित्रा घेऊन व्यायाम शाळेचा संपूर्ण निधी १८.५ टक्के दराने सव्याज कार्यालयाला परत करा अन्यथा फौजदारी गुन्हा दाखल करू, असा आदेश संबंधित संस्थेला बजावला.