आकर्षक वाहन क्रमांकातून ११ लाखांचा महसूल!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2017 08:17 PM2017-08-02T20:17:18+5:302017-08-02T20:23:43+5:30
वाशिम - वाहनांच्या आकर्षक नोंदणी क्रमांकाची क्रेझ दिवसेंदिवस वाढत चालल्याचे दिसून येते. आकर्षक नोंदणी क्रमांकापोटी वाशिम उपप्रादेशिक परिवहन विभागाला गत तीन महिन्यांत ११ लाख १८ हजार ५०० रुपयांचा महसूल मिळाला.
लोकमत न्यूज नेटवर्क

स्वत:ची मनपसंद, आवड, इच्छा पूर्ण करण्यासाठी ‘पैसा’ मोजण्याची तयारी असणाºयांची संख्या कमी नाही. प्रत्येकच क्षेत्रात ‘आवड व निवडी’ने प्रवेश केल्याने विशिष्ट निवडीला अर्थपूर्ण महत्त्व प्राप्त झाले आहे. स्वत:च्या आवडी-निवडी जपण्यासाठी पैसा ही बाब गौण्य ठरते, ही बाब वाहनांच्या आकर्षक क्रमांकाच्या खरेदीवरून दिसून येते. ग्राहकांची ‘पसंती आणि आकड्यांचा लाभदायक खेळ’ पूर्ण करण्याची धडपड पाहून परिवहन विभागाने महसूल वाढीची योजना अंमलात आणलेली आहे. यानुसार व्हिआयपी किंवा वेगळी ओळख सांगणारे वाहन ‘क्रमांक’ आरक्षित करून त्याला ‘किंमत’ देण्यात आली. चालू आर्थिक वर्षातील गत तीन महिन्यांत १३१ वाहन धारकांनी आकर्षक वाहन क्रमांकापोटी पैसे भरले आहेत. याची किंमत ११ लाख १८ हजार ५०० रुपयांच्या घरात आहे. यामध्ये एका वाहनधारकाने आकर्षक क्रमांकासाठी तब्बल दीड लाख रुपये मोजले आहेत.