मालमत्ता खरेदी-विक्रीच्या व्यवहारातून ४.५९ कोटींचा महसूल !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 06:09 AM2021-01-08T06:09:45+5:302021-01-08T06:09:45+5:30
जमीन, प्लॉट, घर यांसह अन्य मालमत्ता खरेदी-विक्रीचे व्यवहार करण्यासाठी रिसोड येथील दुय्यम निबंधक कार्यालयात जानेवारी महिन्यातही गर्दी होत असल्याचे ...
जमीन, प्लॉट, घर यांसह अन्य मालमत्ता खरेदी-विक्रीचे व्यवहार करण्यासाठी रिसोड येथील दुय्यम निबंधक कार्यालयात जानेवारी महिन्यातही गर्दी होत असल्याचे दिसून येते. सरत्या वर्षात कोरोनामुळे एप्रिल ते जून महिन्यापर्यंत मालमत्ता खरेदी-विक्रीचे व्यवहार प्रभावित झाले होते. जुलै महिन्यापासून जनजीवन पूर्वपदावर येण्याबरोबरच मालमत्ता खरेदी-विक्रीचे व्यवहार हळूहळू सुरू झाले. महसूल वाढीसाठी शासनाने डिसेंबरअखेर ऑनलाइन चलान भरल्यानंतर पुढील तीन महिने खरेदी-विक्रीच्या व्यवहारात तीन टक्के सवलत देण्यात आली. यामुळेदेखील डिसेंबर महिन्यात खरेदी-विक्रीच्या व्यवहारात वाढ झाल्याचे रिसोड तालुक्यात दिसून येते. डिसेंबर महिन्यात मालमत्ता खरेदी-विक्रीचे १२६५ व्यवहार झाले असून, ६७ लाख १० हजार ५०० रुपयांचा महसूल मिळाला. जानेवारी ते डिसेंबर २०२० या कालावधीत तालुक्यात मालमत्ता खरेदी-विक्रीचे ४१५९ व्यवहार झाले असून, यामधून ४ कोटी ५९ लाख ७९ हजार २८८ रुपयांचा महसूल मिळाला आहे. जानेवारी महिन्यातही येथील दुय्यम निबंधक कार्यालयात मालमत्ता खरेदी-विक्रीच्या व्यवहारासाठी गर्दी होत असल्याचे दिसून येते.