वाशिमच्या उपप्रादेशिक परिवहन विभागाची ११२ टक्के महसूल वसुली !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2018 03:37 PM2018-04-11T15:37:09+5:302018-04-11T15:37:09+5:30
वाशिम - वाशिमच्या उपप्रादेशिक परिवहन विभागाने सन २०१७-१८ या वर्षात महसूल वसूलीच्या उद्दिष्टापेक्षा १२ टक्क्याने अधिक महसूल शासनाच्या तिजोरीत टाकला आहे. २४.४८ कोटींचे उद्दिष्ट असताना प्रत्यक्षात २७.४८ लाख महसूल वसूल केला.
वाशिम - वाशिमच्या उपप्रादेशिक परिवहन विभागाने सन २०१७-१८ या वर्षात महसूल वसूलीच्या उद्दिष्टापेक्षा १२ टक्क्याने अधिक महसूल शासनाच्या तिजोरीत टाकला आहे. २४.४८ कोटींचे उद्दिष्ट असताना प्रत्यक्षात २७.४८ लाख महसूल वसूल केला.
वाहनांना परवाना देण्याबरोबरच वाहतूक नियमांना पायदळी तुडविणाºयांकडून दंड वसूल करण्याची जबाबदारी परिवहन विभागावर सोपविण्यात आली आहे. आर्थिक वर्षात शासनाच्यावतीने परिवहन विभागाला महसूल वसुलीचे उद्दिष्टही दिले जाते. विविध मार्गाने महसूल वसूल करण्याच्या दृष्टिने २०१७-१८ या आर्थिक वर्षात उपप्रादेशिक परिवहन विभागाने विविध मोहिम राबवून उद्दिष्टापेक्षा अधिक महसूल वसूल केला. २०१७-१८ या आर्थिक वर्षात एकूण १६ हजार ७२ नवीन वाहनांची नोंदणी झाली आहे. यामध्ये १३ हजार २४ दुचाकी, ११३४ चारचाकी (कार व जीप), दोन आॅटोरिक्षा, ६२ ट्रक, ३७६ डिलीव्हरी व्हॅन्स, १४५७ ट्रॅक्टर-ट्रेलर, १७ प्रवासी वाहनांचा समावेश आहे. तसेच या वर्षात ७२७१ नवीन चालक परवाना, २९८ नवीन वाहक परवाना, ३५७ नवीन परवान्यांचे वितरण करण्यात आले. विविध मार्गाने २४.४८ कोटींचे महसूल वसूलीचे उद्दिष्ट असताना ३१ मार्च २०१८ अखेर २७ कोटी ४८ लाख रुपये महसूल शासनाच्या तिजोरीत टाकण्यात आला. कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचाºयांच्या सहकार्यातून महसूल वसूलीचे उद्दिष्ट साध्य करणे शक्य झाले, असे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.