महसूल कर्मचा-यांचे कामबंद आंदोलन !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2017 07:06 PM2017-10-10T19:06:29+5:302017-10-10T19:07:32+5:30

वाशिम - विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी महसूल कर्मचारी संघटनेने १० आॅक्टोबरपासून राज्यभरात काम बंद आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनात वाशिम जिल्ह्यातील सर्व महसूल कर्मचारी व पदोन्नत नायब तहसीलदार सहभागी झाले आहेत, असा दावा महसूल कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विशाल डुकरे यांनी केला.

Revenue Workers' Work-off Movement! | महसूल कर्मचा-यांचे कामबंद आंदोलन !

महसूल कर्मचा-यांचे कामबंद आंदोलन !

Next
ठळक मुद्देविविध मागण्या प्रलंबित कामकाज ठप्प

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम - विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी महसूल कर्मचारी संघटनेने १० आॅक्टोबरपासून राज्यभरात काम बंद आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनात वाशिम जिल्ह्यातील सर्व महसूल कर्मचारी व पदोन्नत नायब तहसीलदार सहभागी झाले आहेत, असा दावा महसूल कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विशाल डुकरे यांनी केला.
पुरवठा विभागातील पुरवठा निरीक्षक पद सरळसेवेने भरल्यास महसुल विभागातील  अव्वल कारकुन दर्जाचे कर्मचाºयावर अन्याय होणार असून अनेक अव्वल कारकुन संवर्गातील कर्मचारी यांना पदावनत व्हावे लागणार आहे. त्यामुळे पुरवठा विभागाचे परिपत्रकान्वये दिलेल्या पदभरतीच्या सुचनेला स्थगिती देण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य महसुल कर्मचारी संघटनेने शासनाकडे यापूर्वी निवेदनाद्वारे केली होती. मात्र, या मागणीवर कोणताच विचार न झाल्याने ३ आॅक्टोबरपासून  पुरवठा विभागाचे कर्मचारी कामबंद आंदोलनावर गेले आहेत. यामध्ये वाशिम जिल्ह्यातील कर्मचाºयांचादेखील सहभाग आहे. महसूल कर्मचाºयांच्या प्रलंबित मागण्यांकडेही शासनाचे दुर्लक्ष होत असल्याने महसूल कर्मचाºयांनी १० आॅक्टोबरपासून कामबंद आंदोलन पुकारले आहे.
महसूल कर्मचाºयांच्या प्रलंबित मागण्यांच्या अनुषंगाने सन २०१२ ते २०१५ या चार वर्षात राज्यात विविध टप्प्यात आंदोलन करण्यात आले होते. सन २०१३ व २०१४ मध्ये तत्कालिन उपमुख्यमंत्री, तत्कालिन महसूल मंत्री, अपर मुख्य सचिव व वित्त विभागाच्या अधिकाºयांशी महसूल कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाºयांनी चर्चा केली होती. प्रलंबित मागण्यांपैकी काही मागण्या मान्य करून लवकरच शासन निर्णय जारी केला जाईल, असे आश्वासन दिले होते. या आश्वासनानुसार त्यावेळी आंदोलन स्थगीत करण्यात आले होते, असा दावा महसूल कर्मचारी संघटनेने केला. या आश्वासनाला तीन वर्षे झाले, मात्र अद्यापही कार्यवाही नसल्याने महसूल कर्मचाºयांमधून असंतोष व्यक्त होत आहे. या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी १० आॅक्टोबरपासून बेमुदत कामबंद आंदोलन पुकारले असून, वाशिम जिल्ह्यातील महसूल कर्मचारी, पदोन्नत नायब तहसीलदार या आंदोलनात सहभागी झाले आहेत. त्यामुुळे जिल्हाधिकारी कार्यालयासह तहसील कार्यालयातील महसूलविषयक कामकाज ठप्प झाले.
 

Web Title: Revenue Workers' Work-off Movement!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.