परमपूज्य मुनिश्री १०८ विशेष सागरजी महाराज याचे कारंजात आज आगमन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2021 04:29 AM2021-07-18T04:29:06+5:302021-07-18T04:29:06+5:30
परमपूज्य मुनिश्री १०८ विशेषसागरजी महाराजांचे हा २५ वा चातुर्मास असल्याने या चातुर्मासाला महत्त्व प्राप्त झाले आहे. पूज्य आचार्य श्री ...
परमपूज्य मुनिश्री १०८ विशेषसागरजी महाराजांचे हा २५ वा चातुर्मास असल्याने या चातुर्मासाला महत्त्व प्राप्त झाले आहे. पूज्य आचार्य श्री १०८ विरागसागरजी महाराजांचे कारंजा नगरीत १९८१, १९८२ व २००४ असे चातुर्मास झाले आहेत. परमपूज्य मुनिश्री १०८ विशेष सागरजी महाराजांचा विशेष प्रभाव असून, त्यांनी अनेक मंदिरांचा जीर्णोद्धार केला आहे. यामध्ये प्रामुख्याने महाराष्ट्रात सावदा, धामणगाव, सिंदखेडराजा, पुसगाव, रिसोड, इत्यादींचा समावेश आहे. तथा मुनिश्रींच्या आशीर्वादाने मालेगाव, फैजपूर येथे जीर्णोद्धाराचे कार्य सुरू आहे. धार्मिक कार्य युवकांच्या हातून घडून आणून घेण्यात महाराजांचे विशेष कार्य आहे. रविवारी सकाळी नऊ वाजता श्री विशेष सागरजी महाराजांचे आगमन शहरात होत असून, स्थानिक सरस्वती भुवन येथे महाराज निवास करणार आहेत. याकरिता चातुर्मास समिती स्थापन करण्यात आली आहे.