मतदान केंद्राच्या स्थितीचा पोलीस प्रशासनाकडून आढावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2021 04:31 AM2021-01-10T04:31:40+5:302021-01-10T04:31:40+5:30
शिरपुरातील केंद्रांची पोलीस अधीक्षकांकडून पाहणी शिरपूर जैन: येत्या १५ जानेवारी रोजी होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ९ जानेवारी रोजी पोलीस ...
शिरपुरातील केंद्रांची पोलीस अधीक्षकांकडून पाहणी
शिरपूर जैन: येत्या १५ जानेवारी रोजी होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ९ जानेवारी रोजी पोलीस अधीक्षक वसंत परदेशी यांनी शिरपूर ग्रामपंचायतमधील मतदान केंद्राची पाहणी केली. यावेळी शिरपूरचे पोलीस निरीक्षक सुनील वानखेडे, उपनिरीक्षक अजय महल्लेंसह पोलिसांना मार्गदर्शन त्यांनी केले.
गतवर्षी मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक १५ जानेवारी रोजी होत आहे. त्या अनुषंगाने प्रशासनाकडून निवडणुकीची जय्यत तयारी सुरू आहे. यात मतदान केंद्रांची पाहणीही पोलीस आणि प्रशासनाकडून केली जात आहे. त्यानुसार ९ जानेवारी रोजी पोलीस अधीक्षक वसंत परदेशी यांनी शिरपूर येथील कै. कोंडबा तात्या ढवळे विद्यालयातील मतदान केंद्राला भेट दिली, तसेच निवडणुकीनिमित्त पोलीस निरीक्षक सुनील वानखेडे, पोलीस उपनिरीक्षक अजय महले यांच्यासह पोलिसांना काही महत्त्वपूर्ण सूचनासुद्धा दिल्या. यावेळी शाळेचे उपमुख्याध्यापक धनंजय नाकाडे, शिक्षकेतर कर्मचारी राहुल पडघान, संतोष गावंडे उपस्थित होते.
-------
इंझोरीत एसडीपीओंच्या मार्गदर्शनात रुटमार्च
लोकमत न्यूज नेटवर्क
इंझोरी: येत्या १५ जानेवारी रोजी इंझोरी ग्रामपंचायतच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान होत आहे. या अनुषंगाने कारंजाचे उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पाटील यांनी ९ जानेवारी रोजी जि.प. शाळेतील मतदान केंद्राला भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांच्या मार्गदर्शनात पोलीस आणि दंगाकाबू पथकाने गावातून रूटमार्चही काढला.
येत्या १५ जानेवारी रोजी इंझोरी ग्रामपंचायतच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान होत आहे. यासाठी जिल्हा परिषद शाळेची मतदान केंद्र म्हणून निवड करण्यात आली आहे. या अनुषंगाने मतदान केंद्र परिसरात शांतता व सुव्यवस्था अबाधित राहण्याच्या दृष्टीने कारंजाचे उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पाटील यांनी मतदान केंद्र परिसराला भेट देऊन परिसराची पाहणी केली. इंझोरी गावात पहिल्यांदाच पोलिसांनी मतदान केंद्राला भेट देऊन गावात रूटमार्च काढल्याने गावातील महिला व ग्रामस्थांत चर्चेला उधाण आले होते. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पाटील यांच्यासह मानोरा पोलीस स्टेशनचे ठाणेदार शिशीर मानकर व उप-निरीक्षक सविता वड्डे यांच्यासह इतर पोलीस कर्मचारी उपस्थित होते.
===Photopath===
090121\09wsm_2_09012021_35.jpg
===Caption===
शिरपुरातील केंद्रांची पोलीस अधीक्षकांकडून पाहणी