आरोग्य अधिकाऱ्यांनी घेतला आढावा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:45 AM2021-04-28T04:45:09+5:302021-04-28T04:45:09+5:30
०००००० तामसाळा परिसरात पाणीटंचाई वाशीम : वाशीम तालुक्यातील तामसाळा परिसरात कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाल्याने गावकऱ्यांना दूरवरून पाणी आणावे लागत ...
००००००
तामसाळा परिसरात पाणीटंचाई
वाशीम : वाशीम तालुक्यातील तामसाळा परिसरात कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाल्याने गावकऱ्यांना दूरवरून पाणी आणावे लागत आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी नागरिकांनी केली.
०००
०००
वारला येथे तीन कोरोना रुग्ण
वाशीम : वाशीम तालुक्यातील वारला येथे आणखी तीन जणांचा कोरोना चाचणी अहवाल मंगळवारी पॉझिटिव्ह आला. बाधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या संदिग्ध रुग्णांची आरोग्य विभागातर्फे तपासणी करण्यात आली.
००००
उकळीपेन परिसरात अवैध वृृक्षतोड
वाशीम : वाशीम तालुक्यातील उकळीपेन परिसरात आडजात वृक्षांची विनापरवाना कत्तल होत आहे. याकडे वनविभागाने लक्ष देण्याची मागणी वृक्षप्रेमींनी मंगळवारी केली आहे.
०००
आरोग्यवर्धिनी केंद्रातर्फे मार्गदर्शन
वाशीम : जऊळका रेल्वे येथील आरोग्यवर्धिनी केंद्राच्या वतीने गावात आरोग्यविषयक जनजागृृती करण्यात आली. नागरिकांनी गावात कुठेही गर्दी करू नये तसेच कुणाच्या संपर्कात येऊ नये, असे आवाहन केले.
००००
पुलाचे मोजमाप पूर्ण, दुरुस्ती प्रलंबित
वाशीम : इंझोरी येथील पिंपळगाव मार्गावरील पूल दोन वर्षांपूर्वी पुरामुळे वाहून गेला. या पुलाचे मोजमाप केले, परंतु या पुलाचे काम अपूर्णच आहे. त्यामुळे वाहनचालकांची गैरसोय होत आहे.
०००
पेयजल योजनेचे काम पूर्णत्वास
वाशीम : तोंडगाव येथे जि.प. ग्रामीण पेयजल योजनेचे काम पूर्णत्वास आले आहे. जि.प. सभापती चक्रधर गोटे यांनी या कामासाठी पुढाकार घेतला होता. आता गावातील पाणीटंचाईवर मात झाल्याने गावकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
००००
मंगरुळपीर शहरात २२ कोरोनाबाधित
वाशीम : मंगरुळपीर तालुक्यात कोरोनाचा संसर्ग वाढतच असून, मंगळवारी प्राप्त अहवालानुसार शहरातील २२ जणांना कोरोना संसर्ग असल्याचे स्पष्ट झाले. नागरिकांनी योग्य ती दक्षता घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले.
०००००००००००००००
किन्हीराजा परिसरात आरोग्य तपासणी
वाशीम : किन्हीराजा परिसरात वाढता कोरोना संसर्ग पाहता आरोग्य विभागाकडून दक्षतेच्या दृष्टिकोनातून आरोग्य तपासणी व सर्वेक्षण मोहीम सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेंतर्गत बाधित रुग्णाच्या संपर्कातील व्यक्तीसह इतरही व्यक्तींची तपासणी केली जात आहे. मंगळवारी किन्हीराजा येथे आणखी सात जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला.
०००
४७ वाहनांवर दंडात्मक कारवाई
वाशीम : वाशीम शहर वाहतूक शाखेकडून राबविण्यात येत असलेल्या मोहिमेंतर्गत वाशीम शहरात मंगळवारी वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ४७ वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.