मानाेरा येथे कृषी विभागाची आढावा बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 04:30 AM2021-06-02T04:30:44+5:302021-06-02T04:30:44+5:30
शेतकरी यांना बियाणे उपलब्ध झाले पाहिजे, महाबीज बियाणे उपलब्ध करावे, शेतकरी यांना पेरणीबाबत माहिती द्यावी, कृषी केंद्राची तपासणी करावी ...
शेतकरी यांना बियाणे उपलब्ध झाले पाहिजे, महाबीज बियाणे उपलब्ध करावे, शेतकरी यांना पेरणीबाबत माहिती द्यावी, कृषी केंद्राची तपासणी करावी आदी सूचना दिल्या. महाबीज बियाणे मागणी महामंडळाकडे केली आहे, मात्र उत्पादन कमी असल्याने बियाणे पुरवठा फारच कमी आहे. जेवढे बियाणे आले ते विक्री केले आहे. कोणत्याही कृषी केंद्रात जादा दराने बियाणे विक्री केली जात नाही. शेतकरी यांनी पक्की पावती घेतल्याशिवाय बियाणे खरेदी करू नये, आमचे याबाबत लक्ष आहे, असे पंचायत समितिचे कृषी अधिकारी डिगांबर मकासरे यांनी सांगितले. यावेळी तालुका कृषी अधिकारी के. डी. सोनटक्के, प्रकाश जाधव, पंचायत समितीचे कृषी अधिकारी डिगांबर मकासरे, कृषी अधिकारी(वी घ यो) जयंत शेंडे, कृषी विस्तार अधिकारी जी. एस. चिंतावार उपस्थित होते.