समृद्ध गाव स्पर्धेचा आढावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2021 04:27 AM2021-07-01T04:27:41+5:302021-07-01T04:27:41+5:30
यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत, उप वनसंरक्षक सुमंत सोळंके, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, जिल्हा अधीक्षक कृषी ...
यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत, उप वनसंरक्षक सुमंत सोळंके, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार, पानी फाऊंडेशनचे डॉ. अविनाश पोळ, कारंजाचे तालुका कृषी अधिकारी संतोष वाळके, सुभाष नानवटे यांची प्रमुख उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. म्हणाले, स्पर्धेमध्ये समाविष्ट गावांमध्ये यापुढे वृक्ष लागवड, फळबाग लागवड करण्यावर भर द्यावा. तसेच शेतकऱ्यांना मृद आरोग्याविषयी माहिती देऊन त्या अनुषंगाने योग्य मार्गदर्शन करावे. कृषी विभागाच्या योजनांचा लाभ घेऊन गावांमध्ये कृषी मालावर प्रक्रिया करणारे लघु उद्योग उभारण्यासाठी प्रयत्न करावेत, अशा सूचना दिल्या. समृद्ध गाव स्पर्धेमध्ये समाविष्ट गावांमध्ये आतापर्यंत झालेल्या कामांचा आढावा आणि पुढील दिशा ठरविण्यासाठी झालेल्या या बैठकीमध्ये नानवटे यांनी आतापर्यंत झालेल्या कामांची माहिती दिली. स्पर्धेत सहभागी झालेल्या २९ गावांना पर्जन्यमापक यंत्रांचे वितरण करण्यात येणार आहे.