विभागीय आयुक्तांकडून मतदार यादी पुनरीक्षणाचा आढावा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2017 11:08 PM2017-10-12T23:08:23+5:302017-10-12T23:09:54+5:30

राज्यात दि. १ जानेवारी २०१८ या अर्हता दिनांकवर आधारित मतदार याद्यांचा विशेष पुनरीक्षण कार्यक्रम दि. ३ आॅक्टोंबर ते दि. ३ नोव्हेंबर २०१७ या कालावधीत होते आहे.  विभागीय आयुक्त तथा मतदार यादी निरीक्षक पियुष सिंह यांनी गुरुवारी वाशिम जिल्ह्यातील या कार्यक्रमाचा आढावा घेतला.

Review of voter list review by departmental commissioner! | विभागीय आयुक्तांकडून मतदार यादी पुनरीक्षणाचा आढावा!

विभागीय आयुक्तांकडून मतदार यादी पुनरीक्षणाचा आढावा!

googlenewsNext
ठळक मुद्देअधिका-यांना मार्गदर्शन१८ वर्षाच्या व्यक्तींना समाविष्ट करण्याचे निर्देश 

लोकमत न्यूज नेटवर्क 
वाशिम: राज्यात दि. १ जानेवारी २०१८ या अर्हता दिनांकवर आधारित मतदार याद्यांचा विशेष पुनरीक्षण कार्यक्रम दि. ३ आॅक्टोंबर ते दि. ३ नोव्हेंबर २०१७ या कालावधीत होते आहे.  विभागीय आयुक्त तथा मतदार यादी निरीक्षक पियुष सिंह यांनी गुरुवारी वाशिम जिल्ह्यातील या कार्यक्रमाचा आढावा घेतला. यावेळी वाशिम जिल्ह्यातील वयाची १८ वर्षे पूर्ण केलेल्या प्रत्येक व्यक्तीचे नाव मतदार यादीमध्ये समाविष्ट करण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. याप्रसंगी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्यासह उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुनील कोरडे, उपजिल्हाधिकारी दिनेशचंद्र वानखेडे, वाशिमचे उपविभागीय अधिकारी अभिषेक देशमुख व सर्व तहसीलदार उपस्थित होते.
विभागीय आयुक्त सिंह म्हणाले की, मतदार याद्यांमध्ये पुरुष व महिला मतदारांचे लिंग गुणोत्तर प्रमाण हे जिल्ह्याच्या लोकसंख्येच्या लिंग गुणोत्तर प्रमाणा इतके राहील, याची दक्षता घ्यावी. यासाठी महिला मतदारांची नोंदणी करण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत. तसेच मतदार यादीमध्ये समाविष्ट असलेली मयत मतदार, दुबार नाव नोंदणी असलेले मतदार व स्थलांतरित मतदारांची नावे मतदार यादीतून वगळण्याची कार्यवाही सुद्धा या दरम्यान करणे आवश्यक आहे. ही कार्यवाही करताना योग्य ती शहानिशा केल्यानंतरच मतदारांची नावे वगळावी. मतदार याद्यांचा विशेष पुनरीक्षण कार्यक्रम अंतर्गत ८ व २२ आॅक्टोंबर २०१७ रोजी मतदार नोंदणीसाठी विशेष मोहीम राबविण्याच्या निवडणूक आयोगाच्या सूचना आहेत. मात्र ग्रामपंचायत निवडणुकीमुळे ८ आॅक्टोंबर २०१७ रोजी नागरिकांचा अल्प प्रतिसाद मिळाला आहे, तसेच २२ आॅक्टोंबर २०१७ रोजी दिपावली सण असल्याने आता या दोन दिवसांबरोबरच २९ आॅक्टोंबर २०१७ रोजी सुध्दा मतदार नोंदणीसाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. तरी या दिवशी जास्तीत जास्त नवीन मतदारांची नोंदणी होईल, यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचनाही विभागीय आयुक्तांनी यावेळी दिल्या. 

Web Title: Review of voter list review by departmental commissioner!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.