वॉटर कप स्पर्धेतील कामांचा जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2019 03:29 PM2019-05-07T15:29:59+5:302019-05-07T15:30:20+5:30
उंबर्डा बाजार ( वाशिम ) : पाणी फाऊंडेशनच्या वॉटरकप स्पर्धेंतर्गत सुरू असलेल्या जलसंधारणाच्या कामांचा आढावा जिल्हाधिकारी हृषिकेश मोडक वारंवार घेत आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
उंबर्डा बाजार ( वाशिम ) : पाणी फाऊंडेशनच्या वॉटरकप स्पर्धेंतर्गत सुरू असलेल्या जलसंधारणाच्या कामांचा आढावा जिल्हाधिकारी हृषिकेश मोडक वारंवार घेत आहेत. या अंतर्गत त्यांनी ७ मे रोजी कारंजा तालुक्याचा दौरा करून कामांची पाहणी केली. त्यावेळी त्यांनी उंबर्डा बाजार येथे सुरू असलेल्या श्रमदानस्थळी भेट देऊन समाधान व्यक्त केले, तसेच ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेऊन समस्यांचे निराकरण करण्यासाठी संबंधित विभागाच्या अधिकाºयांना सुचना केल्या.
वॉटर कप स्पर्धेला ८ एप्रिल पासून सुरूवात झाली असून, जिल्ह्यातील मंगरुळपीर आणि कारंजा तालुक्यातील मिळून १२० गावांनी या स्पर्धेत सहभाग नोंदविला आहे. त्यात कारंजा तालुक्यातील उंबर्डाबाजार येथे वॉटरकप स्पर्धेंतर्गत जलसंधारणासाइी श्रमदान करण्यास ग्रामस्थ उत्साही दिसत आहेत. याच गावात सुरू असलेल्या कामांची पाहणी जिल्हाधिकारी हृषिकेश मोडक यांनी ७ मे रोजी केली. यावेळी कारंजाचे तहसिलदार रणजीत भोसले, गटविकास अधिकारी कालीदास तापी, तालुका कृषी अधिकारी संतोष वाळके, वनपरिक्षेत्र अधिकारी इढोळे व संबंधित विभागाचे कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पाणी फाऊंडेशनचे जिल्हा समन्वयक नानोटे यांनी केले कार्यक्रमात सरपंच वनिता रामदास नागोलकर, सिध्दार्थ देवरे, चंद्रकांत चिरडे, लालमहोम्मद, भारत कानडे आदींनी ग्रामस्थांच्या वतीने समस्या मांडल्या. कार्यक्रमाचे संचलन पाणी फाउंडेशनचे तालुका समन्वयक लोखंडे यांनी तर आभार प्रदर्शन पाणी फाउंडेशनचे विठ्ठल दांडगे यांनी मानले.