निकृष्ट सोयाबीन प्रकरणी रयत क्रांती संघटना आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2018 02:05 PM2018-06-23T14:05:29+5:302018-06-23T14:07:34+5:30

वाशिम : रिसोड तालुक्यात सोयाबीनच्या बॅगमध्ये निकृष्ट दर्जाचे सोयाबीन आढळल्यानंतर तालुका कृषि अधिकाऱ्यांसमक्ष त्या सोयाबीन बॅगचा पंचनामा करुनही संबंधीतांवर अद्याप कोणतीच कारवाई अद्यापही झाली नाही

revolution organization aggressive in the worst soybean case | निकृष्ट सोयाबीन प्रकरणी रयत क्रांती संघटना आक्रमक

निकृष्ट सोयाबीन प्रकरणी रयत क्रांती संघटना आक्रमक

googlenewsNext
ठळक मुद्दे राष्ट्रीय कृषि विस्तार व तंत्रज्ञान अभियान अंतर्गत ८१० क्विंटल बियाणे वाटप करण्यासाठी परमिट पुस्तके तालुका कृषी अधिकारी रिसोड यांना देण्यात आली होती. बियाणे निकृष्ट असल्याचे निदर्शनास आल्यारुन शेतकºयांनी ती बॅग तालुका कृषी अधिकार्‍यांकडे आणली असता त्यांनी सात दिवस उलटल्यानंतरही काहीच कारवाई केली नाही.या प्रकरणी योग्य ती कार्यवाही तात्काळ करण्याची मागणी रयत क्रांती संघटनेचे युवा जिल्हाध्यक्ष सतिश देशमुख यांनी केली आहे.

 
वाशिम : रिसोड तालुक्यात सोयाबीनच्या बॅगमध्ये निकृष्ट दर्जाचे सोयाबीन आढळल्यानंतर तालुका कृषि अधिकाऱ्यांसमक्ष त्या सोयाबीन बॅगचा पंचनामा करुनही संबंधीतांवर अद्याप कोणतीच कारवाई अद्यापही झाली नाही. त्यामुळे रयत क्रांती संंघटनेने आक्रमक पावित्रा घेत या प्रकरणी तातडीने कारवाईची मागणी केली आहे. या संदर्भात त्यांनी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकाºयांना निवेदनही सादर केले आहे. दखल न घेतल्यास रयत क्रांती संघटनेच्यावतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा संघटनेचे जिल्हाध्यक्ष सतिश देशमुख यांनी दिला आहे.
महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ मयार्दीत (महाबीज) अकोला यांच्याकडून राष्ट्रीय कृषि विस्तार व तंत्रज्ञान अभियान अंतर्गत ८१० क्विंटल बियाणे वाटप करण्यासाठी परमिट पुस्तके तालुका कृषी अधिकारी रिसोड यांना देण्यात आली होती. त्यापैकी राम सिडस कॉपोर्रेशन मनसा (गुजरात) यांनी उत्पादीत केलेल्या सोयाबीन जे एस ३३५ या वाणाच्या ३१९ बॅगा भारत कृषी केंद्र रिसोड यांना प्राप्त झाल्या होत्या. त्या लॉटमधील ११ बॅग कुºहा येथील आदिवासी शेतकºयांना वाटप करण्यात आल्या होत्या. सदरील ११ बॅगपैकी एका बॅगमधील बियाणे निकृष्ट असल्याचे निदर्शनास आल्यारुन शेतकºयांनी ती बॅग तालुका कृषी अधिकार्‍यांकडे आणली असता त्यांनी सात दिवस उलटल्यानंतरही काहीच कारवाई केली नाही. त्यामुळे त्रस्त शेतकºयांनी रयत क्रांती संघटनेसह तहसिलदारांना १३ जून रोजी तक्रार दिली होती. यासंदर्भा तालुका कृषी अधिकाºयांकडे चौकश केली असता  भारत कृषी सेवा केंंद्रावरील पुर्ण बॅगा विक्री झाल्याचे गुणवंता नियंत्रण निरिक्षक जोशी यांना आढळून आले. त्यामुळे २० जून रोजी शेतकºयांकडे उपलब्ध असलेल्या सदर लॉटच्या ८ बॅग भारत कृषी सेवा केंद्राने परत घेवून तालुका कृषी अधिकाºयांनी सदर सोयाबीनचा पंचनामा देशमुख यांच्या समक्ष केला. या प्रकरणी योग्य ती कार्यवाही तात्काळ करण्याची मागणी रयत क्रांती संघटनेचे युवा जिल्हाध्यक्ष सतिश देशमुख यांनी केली आहे.

Web Title: revolution organization aggressive in the worst soybean case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.