दहावीच्या निकालातही रिसोडची बाजी

By admin | Published: June 14, 2017 02:38 AM2017-06-14T02:38:32+5:302017-06-14T02:38:32+5:30

रिसोड: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे मार्च २०१७ मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेत रिसोड तालुक्याचा निकाल ९०.०० टक्के लागला.

Riddiq betting in the 10th standard | दहावीच्या निकालातही रिसोडची बाजी

दहावीच्या निकालातही रिसोडची बाजी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
रिसोड: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे मार्च २०१७ मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेत रिसोड तालुक्याचा निकाल ९०.०० टक्के लागला. माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा मार्च २०१७ चा निकाल मंगळवारी आॅनलाइन घोषित करण्यात आला. तालुक्यातील २ शाळांचा निकाल १०० टक्के आहे.
तालुक्यामध्ये ५९ माध्यमिक शाळा असून, परीक्षा २०१७ साठी ४३१७ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते यापैकी ३८९६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत प्रवीण्य क्षेणीमध्ये ९१५ विद्यार्थी प्रथम श्रेणीमध्ये १,६८४ व द्वितीय क्षेणीमध्ये १,१५७ विद्यार्थिनी यश मिळविले आहे. यावर्षी १०० टक्के शाळांचा निकालामध्ये घसरण झाली असून, केवळ २ शाळांचा पात्र ठरल्या आहे यामध्ये रिसोड येथील राजस्थान माध्यमिक विद्यालय व रहेमानिया उर्दू शाळा वाघी खुर्द या शाळांचा समावेश आहे सिद्धेश्वर विद्यालय रिसोडचा निकाल सर्वात कमी लागला आहे तालुक्यातील ५९ शाळेचा निकाल हा ५० टक्के च्यावरच लागला आहे .
तालुक्यातील शाळामध्ये भारत माध्यमिक शाळा रिसोड ९१.१२, भारत माध्यमिक कन्या शाळा रिसोड ८६ टक्के, शिवाजी हायस्कूल रिसोड ८७.४४ टक्के, महात्मा फुले विद्यालय रिसोड ६६.६६ , डॉ. पंजाबराव देशमुख विद्यालय रिसोड ७८.५७ टक्के, शिवाजी विद्यालय मोप ९१.८० टक्के, शिवाजी हायस्कूल भरजहागीर ९७.८७ टक्के, शिवाजी हायस्कूल वाकद ९२.३०, ज्ञानेश्वरी विद्यालय मांडवा ९४.११ टक्के, शिवाजी हायस्कूल रिठद ७४.४७ टक्के शिवाजी हायस्कूल येवता ८५.३६ टक्के, पंडित नेहरू विद्यालय कवठा चिखली ९५.४९ टक्के, भारत माध्यमिक शाळा चिचांबाभर ९८.३८ टक्के, शिवाजी हायस्कूल गोभणी ९५.६५ टक्के, ज्ञानेश्वर विद्यालय करडा ९४.५९ टक्के, सखाराम महाराज विद्यालय लोणी ९०.९० टक्के, रेणुकामाता विद्यालय गोवर्धन ९८.५८ टक्के, शिवाजी विद्यालय केनवड ९५.६३ टक्के, शिवाजी हायस्कूल कोयाळी ८४.९५ टक्के, प्रियदर्शनी विद्यालय आसेगाव पेन ९०.९७ टक्के, महात्मा
गांधी विद्यालय लेहणी ९२.७७ टक्के, सरस्वतीबाई मानधने विद्यालय एकालासपूर ८४.३७ टक्के, रामरावजी झनक विद्यालय नेतन्सा ९०.१९ टक्के, रामरावजी झनक विद्यालय महागाव ८५.९१ टक्के, शिवाजी हायस्कूल हराळ ९४.७८ टक्के, विवेकानंद विद्यालय व्याड ९८.६४ टक्के, सिद्धेश्वर विद्यालय सवड ८२.९७ टक्के, बाबासाहेब धाबेकर विद्यालय केशव नगर ८१.६६ टक्के, बाबासाहेब धाबेकर विद्यालय येवती ८९ टक्के, संभाजीराव देशमुख विद्यालय लिंगापेन ८८.२३, भारत माध्यमिक शाळा चिंचाबापेन ९६.२२, अशी शाळांच्या निकालाची टक्केवारी ठरली आहे.

१८ शाळांची टक्केवारी ९० च्या वर
रिसोड तालुक्यातील केवळ दोन शाळांना यंदा शंभर टक्के निकाल लावणे शक्य झाले. वाशिम, मंगरुळपीर, कारंजा आणि मानोराच्या तुलनेत हे प्रमाण कमी असले तरी, तालुक्यातील एकूण ५९ शाळांपैकी १८ शाळांनी यंदाच्या निकालांत ९० टक्क्यांच्यावर विद्यार्थी उत्तीर्ण करण्यात यश मिळविले. ही बाब निश्चितच उल्लेखनीय आहे. रिसोडचा शैक्षणिक दर्जा आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचा आलेख सतत उंचावत असल्याचे यंदाच्या उच्च माध्यमिक आणि माध्यमिक शाळेच्या वार्षिक परीक्षेतील निकालावरून स्पष्ट होत आहे. रिसोड तालुक्यामध्ये ३२ उच्च माध्यमिक शाळा आहेत. ३० मे रोजी जाहीर झालेल्या उच्च माध्यमिक परीक्षेच्या निकालात या सर्व शाळांमधून परीक्षेला प्रविष्ट झालेल्या ४२८४ विद्यार्थ्यांपैकी त्यापैकी ४०३५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते. ही टक्केवारी ९४.१९ टक्के होती. त्यावेळीही रिसोड तालुका जिल्ह्यात आघाडीवर राहिला होता आणि मंगळवारी जाहीर झालेल्या माध्यमिक शालांत परीक्षेच्या निकालातही या तालुक्यातील विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी करून तालुक्याचा नावलौकिक कायम ठेवला आहे.

Web Title: Riddiq betting in the 10th standard

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.